मालवण तालुका उत्कर्ष मंडळाच्यावतीने वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन..!
15 मे रोजी भरड येथील लिलांजली हाॅलमध्ये संपन्न होतोय मेळावा.
मालवण | सुयोग पंडित :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या ‘मालवण तालुका उत्कर्ष मंडळाचेवतीने’ वधू-वर परिचय मेळावा आयोजित केलेला आहे.
हा उपक्रम नियमित चालू रहावा यासाठी वधू-वर नोंदणी सुरु केलेली आहे. या अंतर्गत वधू वराची माहिती मंडळाकडेच उपलब्ध होईल अशी एकत्रित करून ठेवली जाईल. उपक्रम सतत चालू राहिल याकडे मंडळ विशेष लक्ष देईल असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
आपण स्थळांची नोंदणी करावी व इतरांनाही नोंदणी करावयास सांगणे पहिल्या मेळाव्यास पालकांनी उपस्थित रहावेच तसेच वधू वरांना उपस्थित ठेवण्याचे प्रयत्न करावेत व हा मेळावा तालुक्यापुरता मर्यादित नसून जिल्हयातील सर्वांसाठी खुला आहे असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मेळाव्यापूर्वी किंवा मेळाव्यादिवशी तसेच मेळाव्यानंतरही वधू-वरांची माहिती मंडळाकडे नोंदवून घेतली जाईल. वधू-वर स्थळ सहज उपलब्ध होतील याकडे मंडळाचा कटाक्ष राहील. आपणा सर्व पालकांचे सहकार्य आवश्यक आहे. काही सूचना असल्यास जरुर कळवावे व या सामाजिक सोयीचा उचित् फायदा घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
याविषयी अधिक माहितीसाठी कार्यक्रमाचे आयोजक व मुख्य मुख्य प्रवर्तक श्री. प्रमोद लक्ष्मण मोहिते पत्ता सावली, आदर्शनगर- रवतळे, मालवण मो.नं. ९४२३८७८५९६ / ९५२९७८४९६८ व सहाय्यक श्री. प्रताप सहदेव बागवे मो.नं. ९४२३८७८६५३ आणि सहाय्यक श्री. प्रमोद वसंत परब मो.नं. ९४२२९६७८९० यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
वधू-वर परिचय नोंदणी व संपर्कासाठी पुढील प्रमाणे संपर्क साधावा
१) श्री. हेमंत द. पाडावे. मालवण ९४०५८०९००२ २) श्री. विनायक श्री. परब आचरे ९४२११९१५२४
३) श्री. जयंद्र बु. परव, कट्टा ९५११८७१२५०
४) श्री. संदीप परब, श्रावण ९४२१२६७५०६
५) श्री. राजकुमार ग. राणे, कुणकवळे ९४२३८८१७०८
६) श्री. प्रदीप नाईक साटम, मालवण ९४०३३६८७४०
७) श्री. वसंत हि धुरी, मालवण ९४२१४२१३८६ ८) श्री. सुधीर धुरी, मालवण ९४२३६८४५४५
या कार्यक्रमाला विशेष सल्लागार म्हणून सल्लागार संदीप उर्फ बाबा परब, मालवण यांचे सहकार्य लाभले आहे.
हा वधू-वर परिचय मेळावा लिलांजली हॉल, भरड-मालवण येथे रविवार दिनांक १५ मे २०२२ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० पर्यंत संपन्न होईल.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)