अंतरीचे भाव व्यक्त करण म्हणजे साहित्य : ॲड देवदत्त परुळेकर
चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील चिंदर येथील भगवती मंगल कार्यालय येथे अस्मि प्रतिष्ठान(मुलुंड) मुंबई आयोजित व सौ. आशालता पडवेकर लिखीत ‘आई एक नांव असतं’ व सुधाकर गुडेकर लिखित ‘कृतज्ञ मी..कृतार्थ मी’ अशा दोन पुस्तकांचे प्रकाशन ॲड व ह.भ.प. देवदत्त परूळेकर व श्री. सुरेश ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना हभप. देवदत्त परूळेकर म्हणाले की आपल्या अंतरीच भाव जेव्हा कागदावर साकारले जातात तेव्हा त्याचे साहित्य होता. एखादे पुस्तक लिहून लोकांन पर्यंत पोहोचते तेव्हा ती समाजाला सांगितलेली गोष्ट असते.
दोन्ही पुस्तके आई वरतीच आधारित असल्याने सप्तशक्ती म्हणजेच स्री आहे.
लोकसत्ता उपसंपादक आत्माराम नाटेकर यांनीही आपले साहित्य अभ्यासक सामाजीक व उपयुक्त विचार मांडले.
या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी गुडेकर संपूर्ण कुटुंब, स. भा. चिंदरकर, सुभाष सांबारी, ब्रांजेल फर्नांडीस, मंगलाताई परुळेकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, रवि नातु, विनोद पारकर,अशोक काबंळी तसेच बहुसंख्य साहित्य प्रेमी, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुत्रसंचालन अस्मि प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. जयप्रकाश लब्दे यांनी केले. तर आभार डाॅ. रश्मी गुडेकर यांनी मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)