ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
ऑल इंडिया धनगर समाज महासंघ कोकण प्रदेश मधील रत्नागिरी, रायगड(ग्रामीण), पालघर जिल्हाध्यक्षांच्या व नवी मुंबई विभागीय अध्यक्षांच्या निवडी जाहीर...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

ऑल इंडिया धनगर समाज महासंघ कोकण प्रदेश मधील रत्नागिरी, रायगड(ग्रामीण), पालघर जिल्हाध्यक्षांच्या व नवी मुंबई विभागीय अध्यक्षांच्या निवडी जाहीर...!

प्रकाशन: 02 May 2022 08:43 PM
वाचन संख्या 60

वैभववाडी | ब्युरो न्यूज :ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण जी काकडे यांच्या नेतृत्वाखाली कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांनी ऑल इंडिया धनगर समाज महासंघ कोकण प्रदेश मधील जिल्हाध्यक्षांच्या व विभागीय अध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या.या निवडी मध्ये
रत्नागिरी जिल्हा युवक आघाडी अध्यक्षपदी प्रसाद कोकरे, रायगड ग्रामीण जिल्हा युवक आघाडी अध्यक्षपदी शिवाजी हिरवे, पालघर जिल्हा युवक आघाडी अध्यक्षपदी रामदास शेळके तर नवी मुंबई विभागीय अध्यक्षपदी संजय सातपुते यांची निवड करण्यात आली.
महासंघाचे कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांनी या निवड करताना निवड पत्रात असे म्हटले आहे की,धनगर समाजाच्या हिताचे संवर्धन करण्यासाठी आपण समाजात एकनिष्ठेने काम करत आहात. आपण करत असलेल्या या कार्याचा आम्हाला अभिमान वाटतो.
धनगर समाजाचे संवर्धन आणि समाज हिताचे रक्षण व्हावे या हेतूने राष्ट्रीय पातळीवर पोटशाखा भेद, प्रांतभेद, भाषाभेद बाजूला ठेवून सर्व धनगर समाज एक होत आहे. आपल्या कार्याची दखल घेत या राष्ट्रीय प्रवाहात आपणास सहभागी करून घेऊन आपल्या आजपर्यंतच्या समाजसेवेचा यथोचित गौरव करावा व आपणास आणखी विस्तारित कार्यक्षेत्र उपलब्ध व्हावे, या हेतूने आपली ऑल इंडिया धनगर समाज महासंघ कोकण प्रदेश युवक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी व विभागिय अध्यक्ष पदी निवड करीत आहोत. सदरील पदाचा कार्यकाल हा एक वर्षाचा राहील.
सदरील पदावर उत्कृष्ट काम करून महासंघाने व समाजाने आपल्यावर टाकलेल्या विश्वासास आणि आदरास तडा जाऊ देणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करत कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीबद्दल शुभेच्छा दिल्या. तर याआधी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी अमोल जंगले रायगड शहर जिल्हा अध्यक्ष पदी विश्वास नांगरे तर ठाणे जिल्हाध्यक्षपदी संदीप माने हे यशस्वीरित्या जिल्हा अध्यक्ष पदावर काम पाहत आहेत. या सर्व नवीन निवडीमुळे कोकण प्रदेश मधील ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे हात मजबूत होणार असून समाज बांधवांना न्याय देण्यासाठी हा महासंघ काम करेल असा विश्वास कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांनी व्यक्त केला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स