ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
श्री साई मंडळ मुंबई आयोजित श्री साई मंदिर तारकर्ली येथे 12 वा वर्धापनदिन सोहळा संपन्न…..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

श्री साई मंडळ मुंबई आयोजित श्री साई मंदिर तारकर्ली येथे 12 वा वर्धापनदिन सोहळा संपन्न…..!

प्रकाशन: 02 May 2022 02:53 PM
वाचन संख्या 364

तारकर्ली | सुरेश बापार्डेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या ‘तारकर्ली ग्राम श्री साई मंडळ, मुंबई’ आयोजित 12 वा वर्धापनदिन सोहळा संपन्न झाला. या निमित्त तीन दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

Article image
Article image


पहिल्या दिवशी सकाळी साईंवर अभिषेक करून,सायंकाळी गावातून पालखी मिरवणुकीने सुरुवात व रात्री भजन,कीर्तन,दुसऱ्या दिवशी श्री सत्यनारायण महापूजा ,साई भंडारा,दुपार भजने,रात्री शंभो साई भजन मंडळ मुंबई या तरुण मुलांचा साईंच्या संगीतमय गायनाचा नजराणा भजन,तिसऱ्या दिवशी भजने आणि रात्री सुप्रसिद्ध तेंडोलकर दशावतारी नाट्य मंडळ झाराप यांचे (श्वेत सुर) दशावतार नाट्य असे कार्यक्रम संपन्न झाले.

Article image
Article image

या सोहळ्यात सांस्कृतिक व सामाजिक योगदान देणार्या व्यक्तिंचा सत्कार सोहळा आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व आपली सिंधुदुर्ग नगरी न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक सुयोग पंडित यांच्या हस्ते सर्वांचा शाल पट्टा,श्रीफळ देऊन भक्त सेवेकरी यांचा सत्कार करण्यात आला.

श्री.श्रीकांत बापर्डेकर, बाबा कुबल,देवांग तारी,गजानन बापर्डेकर, महेश केळुसकर,शिवाजी बांदेकर,गणपत कुबल,शंभो साई भजन मंडळ मुंबई,विवेक कुबल,सुभाष केळूसकर,हनुमंत केळुसकर,संतोष बांदेकर,चिन्मयी भोवर, कमला कांत कुबल,गणपत धुरत,परिक्षीत मालाप,नरेश कांदळगावकर,स्पृहा भोवर,बाबू टीकम,कुणाल बापर्डेकर,अंकुश कुबल,वसंत मोंडकर,शंकर केरकर,वंदन केरकर,बाबू कुमठेकर,दाजी केरकर,राजू राऊळ,हेमंत खराडे समीर तेंडुलकर, साईंची भूमिका करणार सुरज परब यांनी नित्य आरती आणि भंडारा बनविण्यास आलेले यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर सुयोग पंडित ,मंडळाचे सरचिटणीस मनोहर बापर्डेकर, खजिनदार प्रकाश बापर्डेकर,शिवाजी बांदेकर,कार्याध्यक्ष सुरेश बापर्डेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कुणाल बापर्डेकर यांनी केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स