ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मळ्यात टेनीस क्रिकेट खेळणार्या मुलांनी दिले रानपक्ष्याला जीवदान ..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मळ्यात टेनीस क्रिकेट खेळणार्या मुलांनी दिले रानपक्ष्याला जीवदान ..!

प्रकाशन: 02 May 2022 11:34 AM
वाचन संख्या 116

चिंदर | विवेक परब : दापोली तालुक्यातल्या आंजर्ले खाडीपट्ट्यातल्या कोंगळे गावात मळ्यात क्रिकेट खेळणार्या दोन मुलांनी एका रानपक्ष्याला जीवदान दिले.

Article image

पुर्वी दगड आणि बेचकी घेऊन पक्ष्यांना टिपण्यासाठी त्यांच्या मागे धावणारी, पाठलाग करणारी मुले आज अशा पक्ष्यांना वाचवत आहेत हे पाहून नवीन पर्यावरण रक्षकांची एक फळी तयार होत असल्याचे चित्र समोर आले आहे.

अन्न शोधताना एक पाणकावळा जातीचा रानपक्षी अनावधानाने शेतीसंरक्षक जाळ्यात अडकला आणि जीवाच्या आकांताने जाळ्यातून सुटण्याचा प्रयत्न करु लागला. मात्र त्याची तडफडती धडपड व फडफडाट यांना तेथे जवळच मळ्यात ‘टेनीस क्रिकेट’ खेळणाऱ्या छोट्या मुलांच्या कानांवर पडला आणि या मुलांनी पुढे सरसावत त्या रानपक्ष्याला जीवदान दिले.

संध्याकाळच्या वेळेस कोंगळे गावात राहणारी सुशील साळवी, समीर साळवी, आयुष साळवी, पारस रेवाळे, वेदांत साळवी, अक्षय साळवी, साहील रेवाळे ही मुले खाडीजवळील शेत मळ्यात क्रिकेट खेळत असताना जवळच भाजीपाला शेतीच्या संरक्षणासाठी लावलेल्या जाळ्यात एक रानपक्षी अडकून जीव वाचविण्यासाठी फडफडाट व कलकलाट करताना या मुलांनी पाहिले. शाळेतली परीक्षा संपल्याने ही मुले दररोज येथील हिरव्यागार मळ्यात क्रिकेट खेळतात. या रानपक्ष्याला वाचविण्यासाठी खेळ अर्ध्यावर सोडून ही मुले धावत त्या पक्ष्याकडे गेली. जीव वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या या रानपक्ष्याला वाचवायलाच हवे असे मनाशी पक्के ठरवून या मुलांनी अथक प्रयत्न करून पाणकावळा जातीच्या त्या रानपक्ष्याला वाचविले. जाळ्यात अडकलेले त्याचे पाय व पंख अलगद सोडवून या मुलांनी त्या पक्ष्यास जीवदान दिले व पाणी पाजून नैसर्गिक अधिवासात सोडले.

सध्या अनेक रानपक्ष्यांच्या प्रजाती दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालल्या आहेत. पर्यावरण संतुलन राखण्याच्या कार्यात पक्ष्यांचे योगदान फार मोठे आहे. पाणकावळा ही एक अशीच दुर्मिळ होत चाललेली पक्षी प्रजाती आहे. मात्र छोट्या मुलांनी या पक्ष्यांचे पर्यावरणासाठीचे महत्त्व ओळखून संकटात सापडलेल्या रानपक्ष्यास जीवदान दिल्याने पर्यावरणप्रेमी व सर्व स्तरांतून या छोट्या मुलांची प्रशंसा होत आहे .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 447

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स