ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवणात 'सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर' अंतर्गत माहिती पुस्तिकेचे वाचन.

मालवणात 'सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर' अंतर्गत माहिती पुस्तिकेचे वाचन.

प्रकाशन: 01 May 2022 04:37 PM
वाचन संख्या 48

आमदार वैभव नाईक व तहसीलदार अजय पाटणे यांच्या उपस्थितीतील कार्यक्रम.

मालवण | सुयोग पंडित : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत समाजकल्याण सिंधुदुर्ग व बार्टी समतादूत प्रकल्प सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण तहसील प्रशासनाच्या सहकार्याने तहसील कार्यालय मालवण येथे समाजकल्याण व बार्टीच्या योजनांच्या माहिती पुस्तिकेचे वाचन करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी आमदार वैभव नाईक, तहसीलदार अजय पाटणे, पोलीस निरीक्षक विजय यादव, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, मंदार केणी, हरी खोबरेकर, नितीन वाळके, बाबी जोगी, किसन मांजरेकर, महेश जावकर, आकांक्षा शिरपुटे, पंकज सादये, सेजल परब, निलम शिंदे आदि उपस्थित होते. यावेळी संग्राम कासले यांनी बार्टी व समाजकल्याणच्या योजनांची माहिती सांगितली. आमदार वैभव नाईक यांनी बार्टी व समाजकल्याणच्या विविध योजनांची माहिती जाणून घेतली.

समाजकल्याण आयुक्त दिपक घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा कार्यक्रम राबविण्यात आला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स