आचरा पोलिसांची तत्परता ; हरवलेले मंगळसूत्र दिले तात्काळ शोधून..
चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा येथे आज महाराष्ट्र दिनी सकाळीच एक वयोवृद्ध दांपत्य आचरा पोलीस ठाण्यात मंगळसूत्र हरवल्याची तक्रार घेऊन घाबरलेल्या अवस्थेत दाखल झाले. आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांनी त्या दांपत्याला धीर देत मंगळसूत्र शोधून काढू अशी खात्री देऊन तात्काळ ते दांपत्य राहत असलेल्या आचरा शिक्षक कॉलनी जवळ दाखल झाले. पोलीस संदिप कांबळे, अक्षय धेंडे, स्वाती जाधव यांच्या सहकार्याने घर व घराचा परिसर पिंजून काढत अनिल रेवंडकर या दांपत्याचे हरवलेले 6 तोळ्यांचे मंगळसूत्र शोधून काढत आपली कर्तव्यदक्षता त्यांनी दाखवून दिली आहे. हरवलेले मंगळसूत्र तात्काळ आचरा पोलिसांनी शोधून दिल्याने रेवंडकर दांपत्याने आचरा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील व सहकारी पोलिसांचे आभार मानले आहेत.आचरा पोलिसांच्या या तत्काळ कृतीची सर्वच स्तरावर प्रशंसा होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)