मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या हस्ते भरड ते बंदरजेटी रस्ता डांबरीकरण कामाचे उद्घाटन ;आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती.
आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या http://localhost/news/public/uploads/20 लाख रुपयांच्या निधीतील प्रकल्प.
मालवणवासियांनी आणि व्यापार्यांनी मानले आमदार नाईक यांचे आभार.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातील भरड नाका ते बंदरजेटी रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा आज शुभारंभ झाला. मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध नेरुरकर ज्वेलर्सचे मालक श्री.उमेश नेरुरकर यांच्याहस्ते या कामाचा शुभारंभ झाला. श्रीफळ वाढवून त्यांनी या डांबरीकरण कामाचे उद्घाटन केले.
मालवण भरड नाका ते बंदरजेटी हा रस्ता गेले काही काळ अतिशय खडबडीत असल्याने सामान्य मालवणवासीय, वाहनचालक व व्यापारीवर्ग त्रस्त होता. आमदार नाईक यांनी या रस्त्याची डागडुजी व संपूर्ण डांबरीकरण यासाठी http://localhost/news/public/uploads/20 लाख रकमेचा निधी मंजूर केला होता.
यावेळी मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांच्यासह मालवण व्यापारी महासंघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, काॅन्ग्रेसचे बाळू अंधारी, माजी नगरसेवक महेश जावकर ,शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, राजा शंकरदास, युवा कार्यकर्ते अमेय देसाई व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते ,रोटरी क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष उमेश सांगोडकर, व्यापारी गणेश प्रभुलीकर, राजेश कोवळे यांसह अनेक राजकिय मान्यवर व मोठ्या संख्येने सामान्य नागरीक उपस्थित होते. उद्गाटनानंतर उपस्थित सर्वांना पेढे वाटण्यात आले.
या डांबरीकरणाच्या कामाला शुभारंभ झाला असून लवकरच मालवण बाजारपेठेतील रस्त्यावरुन चालणे व कुठलेही वाहन चालवणे सुकर होणार असल्याने सामान्य नागरीक व व्यापारी बांधवांनी आमदार वैभव नाईक यांचे गुलाब पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.
रस्त्याच्या कामाच्या दर्जावरही आमदार व संबंधीत अधिकारी व प्रशासन विशेष लक्ष देतीलच अशा समाधानाची खात्री उपस्थितांपैकी काहींनी व्यक्त केली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)