ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
देऊळवाडा रमाई नदी पात्रातील गाळ उपशास सुरुवात..!

देऊळवाडा रमाई नदी पात्रातील गाळ उपशास सुरुवात..!

प्रकाशन: 20 Apr 2022 02:52 PM
वाचन संख्या 75

खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी केली जातीने पाहणी..

पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजनमधून निधी मंजूर..

कणकवली | बंटी राणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या बागायत देऊळवाडा ते मसुरे गडनदी पात्राला जोडणारे सुमारे ५ किलोमीटर लांबीचे रमाई नदीपात्र गेली अनेक वर्षे गाळाने बुजून गेले होते. नदीपात्रातील गाळ उपसा करण्यात यावा ही येथील ग्रामस्थांची गेल्या अनेक वर्षांची मागणी होती. आमदार वैभव नाईक यासाठी पाठपुरावा करत होते. त्यांच्या प्रयत्नातून व खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून यावर्षीच्या जिल्हा नियोजनमधून रमाई नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला असून प्रत्यक्षात गाळ काढण्याचे काम सुरु देखील झाले आहे. चार दिवसापूर्वी खा.विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी त्याठिकाणी भेट देत पाहणी केली. अनेक वर्षांची मागणी पूर्ण केल्याबद्दल सरपंच अदिती मेस्त्री व ग्रामपंचायत सदस्य अशोक मसुरकर यांनी गावच्या वतीने खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांचे आभार मानले.

रमाई नदीच्या पाण्यावर येथील अनेक एकर शेती अवलंबून असायची मात्र गेल्या काही वर्षात रमाई नदीचे पात्र गाळाने बुजत गेले. याचा परिणाम म्हणुन पावसाळ्यात मोठा पूर येत शेती बाधित तर उन्हाळ्यात कोरडी स्थिती असे चित्र गेली काही वर्षे दिसून येत होते. नदी पात्रातील गाळ उपसा करण्यात यावा यासाठी येथील ग्रामस्थ सातत्याने मागणी करत होते. देऊळवाडा ग्रामपंचायततीने सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा सुरू ठेवला. गाळ उपसास प्रारंभ झाला असून ग्रामस्थ शेतकरी यांच्या माध्यमातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

यावेळी माजी जी. प. सदस्य नागेंद्र परब, जि. प. अध्यक्ष संग्राम प्रभुगांवकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, सरपंच अदिती मेस्त्री, उपसरपंच नरेंद्र सावंत,ग्रा, प. सदस्य अशोक मसुरकर,चंद्रकांत राणे, मर्डे सरपंच संदीप हडकर,वर्षाराणी अभ्यंकर, दिलीप सावंत, तातू सावंत, राजेश चिंदरकर, नारायण परब, महेश बागवे, रावजी बागवे, रामदास सावंत, रंजना बागवे, उल्हास मेस्त्री, दिलीप सावंत, कृष्णा बागवे, संतोष काळसेकर, प्रफुल्ल सावंत, सोनू सावंत, विश्वनाथ सावंत, फटूजी बागवे, बाळकृष्ण् मुंडले, सदानंद कबरे, सोनूपंत बागवे, सुरेश घाडीगावकर मनीषा बागवे, संदीपा कबरे, राजश्री सावंत, प्रसन्ना मेस्त्री, सानिका सावंत, अंकिता सावंत, अनिता सावंत, गीतेश्री मसुरकर व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स