ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
"अच्छा चलता हू….."

"अच्छा चलता हू….."

प्रकाशन: 20 Apr 2022 12:49 PM
वाचन संख्या 489

मालवणचे माजी नगराध्यक्ष श्री. महेश कांदळगांवकर यांची स्विच हिट ; शिवसेनेतून बाहेर पडण्याची घोषणा.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणातील सध्याची सर्वात मोठी घटना मालवण शहरात घडली आहे.

मालवणचे माजी नगराध्यक्ष श्री महेश कांदळगांवकर यांनी शिवसेना पक्षातून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे.

त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली असून शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

महिन्याभरापूर्वी मालवण शिवसेनेत ‘नवे जुने’ वादाची जाहिर ठिणगी पडलेल्या घटनेच्या व वक्तव्यांच्या पार्श्वभूमीनंतरचा माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांचा हा निर्णय संपूर्ण मालवणमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. श्री महेश कांदळगांवकर यांनी प्रसिद्धी पत्र काढून जनतेलाही त्यांच्या या निर्णयाची कारण मिमांसा दिली आहे.

कुठलीही राजकीय पाश्वभूमी नसताना नगरपरिषदेतील प्रशासकीय अनुभवावर गेली पाच वर्षे नगराध्यक्ष या प्रतिष्ठेच्या खुर्चीवर बसवल्याबद्दल मालवणच्या जनतेचे आणि शिवसेना पक्षाने आपल्या पक्षातून ही संधी उपलब्ध करून दिल्या बददल या सर्वांचे मनापासून आभार मानतो असे महेश कांदळगांवकर यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच श्री महेश कांदळगांवकर यांनी म्हणले आहे की कुठलीही राजकीय स्पर्धा, शह काटशह मनात न ठेवता आपल्याला दिलेल्या पाच वर्षांच्या कालावधीत मालवण शहराचा विकास कसा करता येईल यासाठी प्रयन्तशील राहिलो. हे करत असताना अनेक आरोप प्रत्यारोप झाले. पण हा राजकारणाचा एक भाग मानून याला उत्तर प्रत्युतरात वेळ न घालवता तसेच प्रसिद्धी च्या मागे जास्त वेळ फुकट न घालवता जास्तीत जास्त मालवण शहराच्या विकास कामाकडे लक्ष दिले. चांगले काम करणाऱ्या व्यक्ती वर आरोप होणार आणि काम करणाऱ्याकडून चुका होणार हे सर्वश्रुत आहे. पण हे करत असताना मालवण च्या जनतेची आणि माझ्या पक्षाची मान खाली जाईल असे कुठलही मागील पाच काम मागच्या पाच वर्षात केले नाही. मालवणच्या नगरपालिकेत राजकीय विरहित काम करताना एक दोन वेळा सभागृहात मतदानाचे ठराव वगळता वर्षात सर्व ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात यश आले. विरोधकांच्या प्रभागात पण लाखो रुपयाच कामे करण्यात आली आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून विरोधी पक्षाच्या चार नगरसेवकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला त्यामुळे पक्षाची ताकद वाढवली.

रस्ते, गटर, स्वच्छता या मूलभूत सोयी बरोबरच मालवणचा पर्यटन दृष्ट्या विकास करण्याच्या दृष्टिने कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव तयार करण्यात आले. यामध्ये रॉक गार्डन येथे डेकोरेटिव्ह लाईट म्युझिकल फाऊंटन, चिवला बीच येथे डेकोरेटिव्ह लाईट, आडारी गणपती मंदिर येथील सुशोभीकरण हॉटेल सायबा नजीकच सुशोभीकरण, मालवण नगर परिषद आणि त्याचा परिसर सुशोभीकरण, पर्यटकांना उपयुक्त असे दिशा दर्शक फलक, बायो टॉयलेट, मामा वरेरकर नाट्यगृह येथे सुसज्ज असा एसी मल्टिपरपज हॉल, अग्निशमन इमारत, सुसज्ज अशी भाजी मार्केट इमारत, नप सफाई कामगार यांच्या साठी बीओटी तत्वावर निवास व्यवस्था, कामे करण्यात आली. बंद असलेल्या भुयारी गटर योजनेला शासनाकडून अनुदान प्राप्त करून घेऊन ते काम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न केले. मालवणच्या नळपाणी योजनेला बरीच वर्षे झाल्याने त्या ठिकाणी सुमारे 45 कोटी रुपयांची नवीन नळपाणी योजना प्रस्तावित करण्यात आली असून लवकरच त्याला अंतिम मंजुरी प्राप्त होणार आहे. कोकणातील पहिल्या प्रथम 25 कोटी रुपयांचा मत्सलयाचा प्रस्ताव शासन दरबारी अंतीम मंजुरीसाठी सादर आहे.
अश्या प्रकारे गेल्या पंधरा त झाली नसतील एवढी कामे या पाच वर्षात करण्यात आली. अर्थात यासाठी शासन दरवारा मंजुरी आणि निधी आमचे आमदार, खासदार, पालकमंत्री मंत्री यांच्या पाठपुराव्याशिवाय शक्य झाले नसते ही वास्तुतिथी आहे.

मागील दोन वर्षाच्या कालावधीत कोरोना चे संकट तोक्ते वादळ यामुळे विकास कामाना अनेक अडचणी आल्या, कामे मुदतीत पूर्ण करता आली नाही हे नाकारता येणार नाही. पण सदय स्तियीत बरीचशी कामे पूर्ण झाली आहेत आणि काही कामे पूर्णत्वाकडे आहेत.

टेंडर प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यात आली. त्यामूळे मागील पाच वर्षात बिलो टेंडर मंजुरी तुन जवळपास 60 ते 70 लाख रुपयाची शासनाच्या निधीची बचत करण्यात आली. मालवणच्या विकासकांना मालवण नप तर्फे पूर्ण पणे सहकार्याची भूमिका ठेवल्यानेच आज मालवण मध्ये अनेक मोठे प्रकल्प सुरू आहेत आणि मालवणच्या सौंदर्यात भर पडली आहे.

परंतु मागील पाच वर्षे मालवण चा विकास हा एकमेव अजेंडा घेऊन काम करत असताना माझा कुटुंबाकडे, आरोग्याकडे. व्यवसायाकडे दुर्लक्ष झालेख. त्यामुळे यापुढे पक्षाच्या कामाला पुरेसा वेळ देणे शक्य होईल असं वाटत नाही. त्यामुळे या कारणास्तव मी आज पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहे. माझ्या कालखंडात मालवण च्या विकासासाठी पक्षाने जे सहकार्य केले त्या बद्दल मालवण वासीयांच्या वतीने मी ऋणी राहीन. यापुढेही मालवण • वासीयांचे कुठलेही निश्चितच प्रयन्त केला जाईल. प्रश्न असतील तर ते सोडवण्यासाठी तसेच जर चांगल्या कामाचे श्रेय जर मला मिळत असेल तर काम करताना नकळत काही चुका झाल्या असतील तर झालेल्या चुकांची आणि याला उत्तर देण्याची जबाबदारी पण माझीच राहील.

माजी महेश कांदळगांवकर यांच्या शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याच्या निर्णयानंतर आता ‘पुढे काय’ ची उत्सुकता व चर्चा मालवण शहरात सुरु आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स