संशयीत कारचालक ताब्यात..!
कणकवली | प्रतिनिधी : काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगांवच्या असरोंडी फाट्याजवळ एका इको कारने पल्सर मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिल्याने काल भीषण अपघात झाला होता. या अपघातात प्रसन्ना उर्फ बाळा प्रकाश मुलुष्ठे(वय -४१ रा-कणकवली,मारुतीआळी) हा युवक जागीच ठार झाला. याप्रकरणी संशयित आरोपी विजय रामादास मोकल( वय-३३,रा.कोयनाड,जि. रायगड) याला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी अभि अशोक आचरेकर यांनी फिर्याद दिली, त्यानुसार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले.
रायगड येथून कार चालक संशयित आरोपी व त्यांचे चार मित्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणात पर्यटनासाठी आले होते. सायंकाळी परत जात असताना ओसरगांव येथे हा अपघात घडला होता. इको कार भरधाव वेगाने होती, त्यामुळे दुचाकीला जोरदार धडक बसली. त्यात बाळा मुलुष्टे हे मोटरसायकल वरुन समोरील बाजूने रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या छातीच्या बरगड्या तुटलेल्या अवस्थेत होत्या, त्यांच्या डाव्या हाताला खांद्यावर दुखापत झाली.तसेच मेंदूलाही गंभीर मार लागला. त्यामुळे त्यांचा नाकातून रक्तश्राव होऊन जागीच मृत्यू झाला असे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अनिल हादळ यांनी माहितीस्वरुपाने स्पष्ट केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)