अनिल सरमळकर लिखीत व दिग्दर्शीत सिनेमात खुद्द 'बिग बी…!'
सावंतवाडी | प्रतिनिधी : फिलिपाईन्स इंटरनॅशनल फिल्म प्रोडक्शन्स निर्मित नियोजित व अनिल सरमळकर लिखित व दिग्दर्शित आगामी ‘ सनी बॅंकर ‘ ही भारतीय आणि जगातील आर्थिक तथा सामाजिक विषमतेवर जळजळीत भाष्य करणारी आणि तेवढीच तुफान हसवेल अशी ‘ब्लॅक कॉमेडी ‘ व सामाजिक वास्तव एका षोडवर्शीय मुलाच्या नजरेतून
पाहणारी कथा असुन शेवटी ती अद्भूतीका अर्थात फॅन्टसीतुन रहस्याकडे जाणारी उत्कंठावर्धक कथा आहे.
बॉलिवूडमधल्या आजवरच्या कथांपेक्षा आगळी वेगळी कथा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
अत्यंत महत्वाकांक्षी असलेल्या या चित्रपटात साक्षात महानायक बिग बी एक उत्सुकता आहेत. ते ‘पूर्ण हटके’ अशीच भूमिका करणार असल्याचे निर्मिती संस्थेने सांगितले असुन
जर खुद्द बिग बी ही भूमीका करतील तर ते आपले भाग्य म्हणायला हवे तसेच अत्यंत अविश्वसनीय असे स्वप्न सत्यात येईल असे या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक डॉ. अनिल सरमळकर यांनी माध्यमांना सांगितले आहे. बिग बी महानायक आहेत . त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकणे हेच माझ्यासारख्या दिग्दर्शकासाठी एक अद्भूत आहे असेही अनिल सरमळकर म्हणाले.
दरम्यान या चित्रपटाचे प्री प्रोडक्शन्स लवकरच सुरु होणार असुन कलाकार तंत्रज्ञ यांचीही निवड करण्यात येणार आहे
तसेच कथा बॅंक विश्वाशी निगडित असुन या आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित केल्या जाणाऱ्या कथेवर अनिल सरमळकर यांनी गेले एक वर्ष काम केले असुन काही अत्यंत महत्वाच्या सल्ल्यासाठी
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ विचारवंत व भारतीय रिजर्व बॅंकेचे माजी गवर्नर डॉ. रघुराम राजन यांची महत्वपूर्ण भेट लेखक दिग्दर्शक डॉ. अनिल सरमळकर घेणार आहेत.
अनिल सरमळकर हे सिंधुदुर्गातील आघाडीचे तरूण कवी लेखक नाटककार असुन गेली दोन दशके ते मराठी व इंग्रजीतुन लेखन करीत असुन ते रंगभूमीवरही कार्यरत आहेत.
तसेच सध्या आतरराष्ट्रीय पातळीवर गाजत असलेल्या ‘द फाॅक्स’ या नाटकाचे ते लेखक आहेत. दरम्यान अनिल सरमळकर लिखित दिग्दर्शित दिर्घ काळ प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत असलेला पहिला मराठी चित्रपट ‘ काहूर ‘ प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहे.
दरम्यान ‘ सनी बॅंकर ‘ हा महत्वाकांक्षी चित्रपट असुन चित्रपटात खुद्द बिग बी अमिताभ बच्चन यांची भूमीका तदेच चित्रपटाची कथा आणि अनिल सरमळकर यांचे दिग्दर्शन यामुळे सिनेमाची उत्सुकता ताणली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)