ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
अरुणा प्रकल्पाच्या कालव्याच्या कामाला सुरुवात….!

अरुणा प्रकल्पाच्या कालव्याच्या कामाला सुरुवात….!

प्रकाशन: 12 Apr 2022 02:24 PM
वाचन संख्या 125

दरम्यान सोनाळी, एडगावांलाही वाहणार जलगंगा..!

वैभववाडी | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील अरुणा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासाठी लागणाऱ्या पाईप लाईन टाकायच्या कामाला सुरुवात झाली आहे.त्यामुळे कुसूर ,सोनाळी,
एडगाव,वायंबोशी परिसरातील अशा 12 गावातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. या गावातून अथक जलगंगा वाहणार आहे.या गावातील नदी व्हाळ तथा ओहोळ बाराही महिने भरून वाहतील. विहिरी भरतील शेतात पाईपने पाणी येईल.शेतीवाडी बहरेल.सर्व काही हिरवे गार होऊन गाव सुजलाम सुफलाम होईल.घरात सुबत्ता येणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार अरूणा प्रकल्पाचा डावा कालवा हा 23 किलोमीटर लांबीचा आहे.त्यातील अरुणा प्रकल्पा पासून कुसूर पर्यंतचा 13 किलोमीटर कालवा हा मातीचा ओपन असून त्या कालव्याचे 10 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे.तीन किलोमीटर लांबीच्या कालव्याचे काम बाकी आहे.पुढील कुसूर ते सांगुळवाडी गावातील सुरुवातीचा भाग हा 10 किलोमीटर लांबीचा कालवा हा पाईप लाईन (नलिका प्रणालीचा )असून त्या साठीच्या कामाची टेंडर प्रक्रिया http://localhost/news/public/uploads/2020 या वर्षात पार पडली आहे.कालव्यासाठी लागणारे पाईप एडगांव या गावात आले असून आपल्या गावात पाणी येईल आणि गाव सुजलाम सुफलाम होईल या मुळे येथील शेतकऱ्यांनी पाईप ठेवण्याचे भाडेही घेतलेले नाही.त्यामुळे या वर्षी काहींना शेती करता आली नाही.

जलसंपदा खात्याचे तसेच कृषी आणि वन खात्याच्या दिरंगाई मुळे कालव्याच्या कामाला विलंब होत आहे.कृषी व वन खात्याकडून वृक्ष मुल्याकंन वेळेवर होत नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी व्यक्त होत आहे.या आधी कोरोनामुळे आणि आता कर्मचारी कमी असल्याने या खात्याकडून वृक्ष मुल्याकंनला विलंब होत असल्याचे कारण दिले जात आहे.

दरम्यान कुसूर गावचे वृक्ष मुल्याकंन पूर्ण झाले असून कुसूर मधली वाडी आणि पिंपळ वाडी दरम्यांन पाईप टाकायचे काम सुरु झाले आहे.त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे .आता सोनाळी गावच वृक्ष मुल्याकंन सुरु झाले आहे.त्यानंतर एडगाव आणि वायंबोशी गावाचं वृक्ष मुल्याकंन होईल. आणि पावसाळ्यानंतर या गावात पाईप टाकायच्या कामाला सुरुवात होईल अशी माहिती सूत्रांनी दिली.कालव्या आड येणाऱ्या वृक्षांचा मोबदला मिळत आहे.आंब्याच्या झाडाला जास्तीत जास्त http://localhost/news/public/uploads/20 हजार रुपये तर काजूंच्या झाडांना 15 हजार रुपये मोबदला मिळत असून सर्व 7/12 वरील हिस्सेदारांच्या बँक खात्यात पैसे समान विभागून ट्रान्स्फर केले जात आहेत.कालव्याच्या कामाला कायद्याने आणि नियमांचे संरक्षण आहे.त्यामुळे सार्वजनिक हिताच्या कामाला जाणून बुजून विरोध करणाऱ्यांचे प्रयत्न निष्फळ ठरणार आहेत,अशी माहिती जलसंपदा खात्याच्या सूत्रांनी दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 442

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स