ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
बुद्धविहार परिसरात जयभीम 2022 महोत्सव' संपन्न..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

बुद्धविहार परिसरात जयभीम 2022 महोत्सव' संपन्न..!

प्रकाशन: 12 Apr 2022 09:14 AM
वाचन संख्या 73

दर्पण प्रबोधिनीचे आयोजन..!

कणकवली | प्रतिनिधी : समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजसुधारणेचे विचार पुढे नेण्याचे कामे दर्पण प्रबोधिनी संघटना करीत आहेत. संघटनेचे हे कार्य अतुनीलय असून दर्पण प्रबोधिनी संघटनेने आयोजित केलेला जयभीम महोत्सव म्हणजे विचारवंतांचा मेळावा असून दर्पण प्रबोधिनीने यापुढील काळात सामाजिक व्यवस्थेत समानता प्रस्थापित होण्याचे कार्य हाती घ्यावे, असे आवाहन सुप्रसिद्ध गझलकार भीमराव पांचाळे यांनी केले.

दर्पण प्रबोधिनी संघटनेचे प्रेरणास्थान उत्तम पवार यांच्या जन्मस्मरण दिनानिमित्त संघटनेतर्फे येथील बुद्धविहार परिसरात जयभीम http://localhost/news/public/uploads/2022 महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. पांचाळे बोलत होते. यावेळी विचारपीठावर दर्पण प्रबोधिनी संघटनेचे अध्यक्ष तथा निवेदक राजेश कदम, जयभीम महोत्सवाचे स्वागताध्यक्ष प्राचार्य सिद्धार्थ तांबे, सत्यशोधक युवा समाजप्रबोधनकार रोशन पाटील, हास्यसम्राट कुणाल मेश्राम, अनिल श्यामराव तांबे, नीलम पवार, रवींद्र पवार, भास्कर तांबे, सामाजिक कार्यकर्ते तथा चित्रकार नामनंद मोडक, समाजभूषण संदीप कदम, महाराष्ट्र राज्य प्राथिमक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम, प्राध्यापक डॉ. राजेंद्र मुंबरकर, डॉ. सोमनाथ कदम, संगम कदम, डॉ. अशोक कदम, रचना तांबे, डॉ. सिद्धार्थ तांबे, डॉ. व्ही.जी.कदम, डॉ., संतोष तांबे, सुधीर तांबे, नरेंद्र तांबे, श्रीधर तांबे, नेहा कदम, स्नेहल तांबे, सुनील तांबे, किशोर कदम, महेंद्र कदम,पी.जी.कदम, विशाल हडकर यांच्यासह संस्थेचे सल्लागार व सदस्य उपस्थित होते.

रोशन पाटील म्हणाले की भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन संघर्ष हा खरा समाजप्रबोधनाचा मार्ग असून सामाजिक चळवळींमध्ये काम करणार्‍यांनी हा मार्ग स्वीकारला पाहिजे. सामाजिक चळवळीची भाषा करणे खूप सोपे असते, परंतु चळवळ पुढे नेण्याचे काम खूप कठीण आहे. आजच्या आधुनिक समाजामध्ये लोकांच्या मानसिकतेत अमुलाग्रह बदल झाला असून समाजप्रबोधनाच्या गोष्टी ऐकण्यापेक्षा मनोरंजनाचे कार्यक्रम अधिक प्रिय वाटत आहेत, ही एक मोठी शोकांतिका आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाचे वाचन लोकांकडून होत नाही. नागरिकांना संविधान वाचण्यासाठी दर्पण प्रबोधिनी संघटनेने प्रवृत्त करण्यासाठी उपक्रम हाती घेतले पाहिजेत. महापुरुष हे आपल्या भारत देशाची भूषणे असून त्यांना कोणत्याही जातीत किंवा धर्मात बांधू नका, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी राजेंद्र मुंबरकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून दर्पण प्रबोधिनी संघटनेच्या जयभीम महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. आरंभी मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, विद्रोही कवी तथा दर्पण संस्थेचे प्रेरणास्थान उत्तम पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमांचे प्रास्ताविक आनंद तांबे यांनी केले. सूत्रसंचालन संदेश तांबे यांनी केले. आभार अनिल तांबे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने नागिरक उपस्थित होते.

जयभीम महोत्सवात दर्पण प्रबोधिनी संघटनेच्या महिला फ्रंटच्या सदस्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमाई यांच्या जीवनप्रवासावर आधारित नृत्यविष्कार, नाटिका, गाणी सादर करीत समाजप्रबोधन केले. तसेच भीमजल्लोष -2022 या सांगीतिक कार्यक्रमात स्टार प्रवाह छोटे उत्साद फेम पृथ्वी तांबे, स्मिता कदम, प्रा. सिद्धार्थ कदम, सुदिन तांबे, दिनेश हेलोडे, सारेगम फेम प्रीतम बावडेकर, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम कुणाल मेश्राम या कलाकारांनी क्रांतिकारी गिते व शाहिर जलसा सादर करत रसिकांना खिळवून ठेवत समाजप्रबोधन केले. तर ईशिका डान्स ग्रुपच्या कलाकारांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराची रसिकांनी प्रशंसा केली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स