शिरोडा वेळागर येथे साकारले केंद्रीय मंत्री नारायण राणेंना शुभेच्छा देणारे वाळूशिल्प…!
वेंगुर्ले | ब्युरो न्यूज : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आज शनिवारी शिरोडा वेळागर येथील समुद्र किनारी आरवली सोंसूरे येथील प्रसिद्ध वाळू शिल्पकार रविराज चीपकर यांनी राणे साहेबांना वाढदिवसानिमित्त वाळू शिल्पाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
रविराज चिपकर यांनी आपल्या अद्भुत कलेने वाळू शिल्पद्वारे विविध कलाकृती वाळू शिल्पातून साकारल्या. अनेक प्रदर्शना मध्येही त्यांनी सहभाग घेतला आहे. दरम्यान त्यांनी आज राणे साहेबांच्या प्रेमा खातर शिरोडा समुद्र किनाऱ्यावर सुंदर असे वाळू शिल्प काढून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ, शिरोडा ग्रामपंचायत सदस्य राहुल गावडे यांनी किनाऱ्यावर भेट देऊन चिपकर यांच्या कलेचे कौतुक केले आहे.
(फोटो सौजन्य : गूगल )
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)