आमदार नितेश राणे पुरस्कृत पडेल मंडल विभाग निहाय 'कमळ चषक क्रिकेट स्पर्धेचे' आयोजन…!
देवगड | ब्युरो न्यूज : केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त व भाजपा स्थापना दिन सप्ताह साजरा करण्यासाठी आमदार नितेश राणे पुरस्कृत पडेल मंडल विभाग निहाय ‘कमळ चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा ९ एप्रिल ते १७ एप्रिल या कालावधीत जिल्हा परिषद विभागवार पार पाडल्या जातील. यात पुरळ जिल्हा परिषद पडेल जिल्हा परिषद येथे ९ एप्रिल ते १० एप्रिल ओम गणेश कॉम्प्लेक्स पडेल कॅन्टीन येथे होणार आहेत, बापर्डे जिल्हा परिषद १६ एप्रिल १७ एप्रिल रोजी स्थळ वाघोटन बंदर.
पोंभूर्ले जिल्हा परिषद १६ ते १७ एप्रिल फणसगाव येथे होणार आहेत, याबाबतची माहिती पडेल मंडल तालुकाध्यक्ष डॉ अमोल तेली यांनी दिली आहे,
या कमळ चषक क्रिकेट स्पर्धेत मोठ्या संख्येने क्रिकेट संघांनी सहभागी व्हावे असे आवाहन भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष उत्तम बिर्जे यांनी केलं आहे.
फणसगांव येथे होणार आहेत, याबाबतची माहिती पडेल मंडल तालुकाध्यक्ष डॉ अमोल तेली यांनी दिली आहे,
या कमळ चषक क्रिकेट स्पर्धेत मोठ्या संख्येने क्रिकेट संघांनी सहभागी व्हावे असे आवाहन भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष उत्तम बिर्जे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी पुरळ जिल्हा परिषद मतदारसंघ व पडेल जिल्हा परिषद मतदार संघ उत्तम बिर्जे ७३८७९६२, बापर्डे जिल्हा परिषद मतदार संघ अमित साळुंखे ९६५७४०८८५९,
पोंभूर्ला जिल्हा परिषद मतदारसंघ बंड्या नारकर ९४२०२६०३६० यांच्याशी संपर्क करुन नावनोंदणी करावी असे आवाहन पडेल मंडल भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)