खासदार श्री.विनायक राऊत साहेब यांची सरपंच, उपसरपंच संघटनेने घेतली सदिच्छा भेट
पोईप |ओंकार चव्हाण : रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव मा.खा.श्री.विनायकजी राऊत साहेब यांच्या निवासस्थानी आज मालवण शिवसेना सरपंच उपसरपंच सेना संघटनेने भेट घेतली.या भेटीमध्ये
येणारा गणेश चतुर्थी सणामध्ये सर्व सरपंच,उपसरपंच यांनी गणेश भक्तांची योग्य ती तपासणी करून घ्यावी कोरोणा माहामारीत घ्यावयाची काळजी, गावनिहाय लसीकरण , गावातील विकासकामे अशा विविध विषयावर चर्चा केली. या चर्चत खासदार विनायक राऊत यांनी सांगितले की तुम्हाला जे काही सहकार्य लागेल ते आम्ही करू आपण सर्वानी एकजुटीने काम करा.
कसाल हेदुळ खोटले हा रस्ता पुर्ण पणे खराब झाला असुन त्या रस्त्याची दुरूस्ती व्हावी अशी मागणी हेदुळ सरपंच श्री नंदु गावडे यांनी खासदार विनायक राऊत यांच्याजवळ या भेटी दरम्यान केली होती ती तात्काळ खासदार विनायक राऊत यांनी मान्य करत लवकरच योजनेत बसवुन तो रस्ता दिवाळीनंतर मंजुर करुन देण्याचे आश्वासन यावेळी दिले आहे सरपंच नंदु गावडे यांनी त्याचे आभार मानले.
यावेळी हेदुळ सरपंच श्री नंदू गावडे, ओवळीये सरपंच श्री अंबाजी सावंत, वायगंवडे सरपंच श्री आनंद सावंत ,मर्डे श्री सरपंच संदिप हडकर, हिवाळे सरपंच श्री पुरुषोत्तम खेडेकर, मर्डे उपसरपंच पींटु गावकर, तळगाव उपसरपंच आनंद चव्हाण हे उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)