ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
शाळा सुरू करणे काळाची गरज श्री.वामन तर्फे अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघ

शाळा सुरू करणे काळाची गरज श्री.वामन तर्फे अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघ

प्रकाशन: 19 Aug 2021 10:55 AM
वाचन संख्या 113

पोईप |ओंकार चव्हाण : गेले दीड वर्ष बंद असलेल्या शाळा सुरू करणे ही आज काळाची गरज बनली आहे अन्यथा पिढ्या बरबाद होऊन विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याचा मुळ उद्देशच बाजूला पडले असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.वामन तर्फे यांनी केले असून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच शारीरिक व मानसिक विकासावर दिर्घकालीन परिणाम होईल अशी भीतीही व्यक्त केली आहे.आणि विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, मानसिक आणि शारीरिक विकास करण्यासाठी पुर्व तयारी आणि नियोजन करुन शाळा सुरू करण्याचा निर्णय सर्वांनी एकत्र येऊन घ्यावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने अध्यक्ष श्री वामन तर्फे व सचिव श्री गुरुदास कुसगांवकर यांनी केली.
कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर गेले दिड वर्ष शाळा बंदच आहेत.गेल्या शैक्षणिक वर्षात काही काळ शाळा सुरू करण्यात आल्या परंतु दुसऱ्या लाटेमुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.दहावी-बारावी बरोबरच इतरही वर्गांच्या परिक्षा न घेता पर्यायी व्यवस्था निर्माण करुन विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात घालण्यात आले असे असले तरी विद्यार्थ्यांचा पाया कच्चाच राहीला, विद्यार्थ्यांच्या त्या-त्या वर्गातील क्षमता विकसित झालेल्या नाहीत.अशा परिस्थितीत मुलांना वरच्या वर्गात घालण्यात अर्थ काय?सद्य स्थितीत शाळा सुरू करण्यासंदर्भात विद्यार्थी, पालक,समाज, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक या सर्वांची मानसिकता निर्माण झाली आहे.शाळा बंद असल्याचे गंभीर दुष्परिणाम या सर्व घटकांना जाणवत आहेत.मुलांचा अभ्यासात लक्ष नाही,वाचन संस्कृती जोपासली जात नाही, ऑनलाईनच्या नावाखाली फोनचा गैरवापर होऊन वाईट प्रवृत्ती वाढत आहे, शिस्त, संस्कार यांचा अभाव, इंटरनेट व्यसनाधीनता वाढत आहे, इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही किंवा फोनच उपलब्ध नाही अशी मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत,अभ्यास सोडून इतर गोष्टींकडे विद्यार्थ्यांचे आकर्षक वाढत आहेत असे अनेक विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम करणारे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत.
शिक्षण विभागाच्या आदेशानुसार शाळा सुरू करण्यासाठी तयारी व मानसिकता तयार झालेली होती आणि महाराष्ट्रातील अनेक भागात शाळा सुरूही झालेल्या आहेत.कोरोना कधी संपणार आहे हे निश्चित नाही .सद्य स्थितीत कोरोनाचा प्रभाव कमी झालेला असताना संस्था, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक यांना स्वातंत्र्य देऊन आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी शासनाने द्यावी , सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्राधान्याने लसीकरण करावे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी शिक्षकांना दिलेल्या कोरोना ड्युट्या रद्द कराव्यात व शाळा सुरू करण्यासाठी योग्य व आवश्यक मार्गदर्शक सूचना देऊन शाळा सुरू करण्यासाठी शासनाने व शिक्षण विभागाने पावले उचलावीत अशी आग्रही मागणी सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने अध्यक्ष श्री.वामन तर्फे व सचिव श्री गुरुदास कुसगांवकर यांनी केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 302

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स