हडी जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने ५० जेष्ठांचा सत्कार!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर
फेस्कॉम संलग्न जेष्ठ नागरिक सेवा संघ हडीच्या वतीने गुढी पाडव्याचे औचित्य साधून ५० जेष्ठ सदस्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. हडी जेष्ठ नागरिक संघ विविध सामाजिक, आरोग्य विषयक उपक्रम सदस्यांसाठी आयोजित करत असतो. गावातील जेष्ठ नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी वेळच्या वेळी घेणे आवश्यक आहे. तुमच्या समस्या सोडविण्यासाठी संघाचे पदाधिकारी प्रयत्नशील असतात. एक विचाराने हा संघ पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकमेकांना सहकार्य करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष श्रीमती चंद्रकला कावले यांनी केले.
यावेळी संघाच्या अध्यक्ष चंद्रकला कावले, माजी कोषाध्यक्ष सौ प्रज्ञा तोंडवळकर, सुप्रिया वेंगुर्लेकर यांच्या हस्ते सदस्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी संघाचे माजी सचिव चंद्रकांत पाटकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना संघाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच जेष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी सचिव सुभाष वेंगुर्लेकर, प्रभाकर चिंदरकर, प्रभाकर तोंडवळकर, दिनकर सुर्वे, रमाकांत सुर्वे, रमेश कावले, गणू परब, गणेश परब, मोहन घाडीगावकर, मनीषा पोयरेकर, रेवती मेस्त्री,
आणि इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी ८० जेष्ठ नागरिक सदस्य उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)