त्रिंबक येथे उद्या ३० रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन.
चिंदर | विवेक परब :महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण सिंधुदुर्ग जिल्हा आणि भाऊ पवार स्मृतिदिन संयोजन समिती त्रिंबक यांच्या संयुक्त विद्यमाने ३० मार्च रोजी सकाळी ९ ते १ या वेळेत त्रिंबक बौद्धवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिवंगत शांताराम पवार यांच्या प्रथम स्मृती दिना निमित्त सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्रिंबक गाव आणि पंचक्रोशीतील रक्तदात्यांनी सदर रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करून सामाजिक उपक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन बौद्ध विकास मंडळ त्रिंबक ग्रामीण आणि मुंबई यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी अमेय लेले, संजय वेंगुर्लेकर (९४२२०५६४४८) येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)