भटके-विमुक्त जाती व जमाती सिंधुदुर्ग जिल्हा कृती समितीच्या अध्यक्षपदी किरण चव्हाण यांची निवड.
सरचिटणीस पदी ॲड. विक्रमसिंह काळे यांची बिनविरोध निवड..!
वैभववाडी | नवलराज काळे : 27 मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भटक्या विमुक्त जाती जमातीतील समाज बांधव एकत्रित सिंधुदुर्गनगरी येथे जमले होते.वसंत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्या प्रवर्गातील जातींची एक मोठी संघटना असावी या दृष्टिकोनातून ही सभा घेण्यात आली होती. या सभेच्या वेळी प्राथमिक चर्चा करून पुढील सभेत सर्व भटके विमुक्त प्रवर्गातील जातींना एकत्र करून कणकवली याठिकाणी बैठक करण्याचे ठरवण्यात आले. तोपर्यंत या सभेत भटके-विमुक्त जाती व जमाती कृती समितीची स्थापना करण्यात आली.
या समितीच्या अध्यक्ष पदी किरण चव्हाण(कासार्डे),सरचिटणीस पदी ॲड.विक्रमसिंह काळे(वैभववाडी),उपाध्यक्ष पदी मारुती मोहिते,खजिनदार पदी संजय पवार तर सदस्य पदी वसंतराव जाधव, नवलराज काळे ,श्री . प्रथमेश अमरापूरकर डॉ.किरण पवार,बाबाजी अडूळकर,अमोल जंगले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही समिती जिल्ह्यातील संघटन सक्षमतेसाठी व वृद्धीसाठी प्रयत्नशील राहील.
पुढील महिन्यात कणकवली या ठिकाणी पुन्हा एकदा या समितीच्या पुढाकारातून एक सभा होईल त्या ठिकाणी संघटना स्थापनेबाबत निर्णय घेण्यात येईल व पुढील वाटचाल कशी करायची हे ठरविण्यात येईल.यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नवनियुक्त पदाधिकारी सदस्यांचे अभिनंदन केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)