ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सिंधुदिनांक

सिंधुदिनांक

प्रकाशन: 29 Mar 2022 07:59 AM
वाचन संख्या 43

२९ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –

सन. १५६१ साली मुघल बादशाहा अकबर यांनी मालवा प्रांताची राजधानी ‘सारंगपूर’ येथे हल्ला करून तेथील सुलतान बाजबहादूर यांचा पराभव केला.

सन १८४९ साली ब्रिटीश शासनाने पंजाब राज्यावर ताबा केला.

इ.स. १८५७ साली बराकपुर येथील इंग्रजांच्या छावणीत कार्यरत असलेले क्रांतिकारक मंगल पांडे यांनी ब्रिटीश अधिकाऱ्यांवर गोळीबार करून स्वातंत्र्य संग्रामाला सुरुवात केली

.सन १९५४ साली भारत सरकारच्या कार्मिक मंत्रालया अंतर्गत कार्यरत असलेली संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच ‘भारतीय लोक प्रशासन संस्था’ ची स्थापना करण्यात आली. या संस्थेचे प्रथम अध्यक्ष टी. एन. चतुर्वेदी होते. तसचं, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहे.

इ.स. १९६८ साली अहमदनगर जिल्हातील राहुरी या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.  महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथ होते.

सन १९८२ साली एन. टी. रामराव यांनी दक्षिण भारतातील आंद्र्प्रदेश व तेलंगाना राज्यात सक्रीय असलेल्या ‘तेलगु देसम पक्षाची’ स्थापना केली. या पक्षाचे विद्यमान अध्यक्ष चंद्रबाबू नायडू असून,  तसचं, त्यांनी आंध्रप्रदेश प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री पद देखील भूषविल आहे.

इ.स. २००४ साली भारतीय क्रिकेटपटू व फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांनी मुलतान या ठिकाणी पाकिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात ३०९ धावा काढून अशी कामगिरी करणारे ते पहिले भारतीय फलंदाज बनले. एकूण कसोटी सामना प्रकारात त्यांनी दोन त्रिशतक झळकावली.

सन २००४ साली आयर्लंड देशाने कामाच्या ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी घातली. अश्या प्रकारची बंदी लागू करणारे ते जगातील पहिले राष्ट्र ठरले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स