ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
शिवसेना नगरसेवक व नगराध्यक्षांची वचनपूर्ती..!

शिवसेना नगरसेवक व नगराध्यक्षांची वचनपूर्ती..!

प्रकाशन: 28 Mar 2022 10:50 PM
वाचन संख्या 112

अपघाताची गंभीरता लक्षात घेत छोट्या व्हाळीच्या वळणावरही ‘घाटाच्या थाटाचे’ सुरक्षा गार्ड..!

मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपालिका प्रभाग 8 मधील वायरी गर्देरोड मार्गावरील गोवेकर घराजवळ असलेले अपघाती वळण आणि शेजारी असलेल्या व्हाळीवरील(छोटा नाल्यावरील) अत्यंत धोकादायक अशा वळणामुळे तिथे गेल्या एक ते दीड वर्षात भरपूर प्रमाणात अपघाताचे प्रमाणे वाढले होते .

यामुळेच शेजारी नागरिक गोवेकर, गांवकर, संजय (बंटी) वराडकर , गणेश वराडकर प्रथमेश हिंदळेकर व गर्देरोड वायरी वासियांनी तिथे योग्य उपयोजना करावी अशी मागणी मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, नगरसेविका तृप्ती मयेकर ,सेजल परब ,पंकज सादये यांच्याकडे केली होती.

अपघातांची गंभीरता व मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर,नगरसेविका सौ.तृप्ती मयेकर, नगरसेवक पंकज सादये व नगरसेविका सेजल परब यांनी जलद गतीने यावर उपाययोजनेची कार्यवाही केली.
या बाबत सामंत कुटुबियांनी जागे बाबत सहकार्य केले.

या व्हाळी वरती राष्टीय महामार्ग किंवा एखाद्या घाटांमध्ये जसे धातुचे सुरक्षा गार्ड बसविण्यात येतात त्या स्वरूपाचे सुरक्षा गार्ड बसविण्याचे काम सुरू असून येत्या आठवडाभरात हे काम पूर्ण होईल असे सांगण्यात आले आहे.

वायरी गर्दे रोड विभागातील बहुतांश नागरिकांकडून शिवसेना नगरसेवकांच्या व मालवण माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांच्या या व्यापक व जलद कार्यवाहीबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स