<em>पळसंब सरपंचांनी घुबडाचे 'ते' पिल्लू केले वनविभागाच्या स्वाधीन..!</em>
चिंदर | विवेक परब : पळसंब झरिचा व्हाळ इथे काल दुपारी असहाय्य अवस्थेत सापडलेले घुबडाचे पिल्लू वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी रोजगार सेवक अमित पुजारे यांच्या सहकार्याने त्या पिल्लाची काळजी घेतली होती.
पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकरांकडून वनविभागाचे कर्मचारी श्री.परब व श्री.परीट यांच्या ताब्यात हे पिल्लू स्वाधीन करताना विशेष कार्यकारी दंडाधिकारी प्रमोद सावंत,श्री.अमित पुजारे व विवेक पुजारे उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)