जिल्हा परिषद केंद्रशाळा नंबर १ ला कामत चॅरिटेबल कडून देणगी.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक पटसंख्या असलेल्या येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा नंबर १ च्या भौतिक सुविधांसाठी दात्यांकडून मदतीचा ओघ सुरू आहे. कामत चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून येथील शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या मंगेश रघुनाथ कामत यांनी प्रशालेला २५ हजार रुपयांचा देणगीचा धनादेश सुपूर्द केला आहे.
गेल्या दोन वर्षात प्रशालेने लोकसहभागातून तब्बल ८ लाख रुपयांहून अधिक रकमेचा शैक्षणिक उठाव केला आहे. मंगेश कामत हे प्रशालेचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी देणगीचा धनादेश शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी समितीच्या उपाध्यक्षा श्रद्धा नार्वेकर, मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, सेवा ज्येष्ठ शिक्षिका सरोज नाईक, सहाय्यक शिक्षक जे. डी. पाटील, शीतल गवस, व्यवस्थापन समिती सदस्य उमेश तळवणेकर, संतोष बांदेकर आदी उपस्थित होते.
येथील अभिनव दर्पण प्रतिष्ठानच्या वतीने शाळेसाठी दोन हजार रुपयांची देणगी आशुतोष भांगले यांनी सुपूर्द केली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)