सिंधुदिनांक
१९ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना
सन १८३१ साली अमेरिकेमधील न्यूयॉर्क शहरात स्थित असलेल्या सिटी बँकेत सर्वप्रथम चोरीची घटना घडली होती. या जोरीमध्ये जवळपास २४५,००० डॉलर चोरीला गेले होते.
सन १८४२ साली गोपाल हरि देशमुख उर्फ लोकहितवादी यांची ‘शतपत्रे’ प्रभाकर वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध होण्यास सरूवात झाली.
सन १९३१ साली अमेरिकेतील नेवाडा राज्यात जुगार खेळण्यास कायदेशीर मान्यता मिळाली होती.
सन १९३२ साली सिडनी येथील हार्बर ब्रिज सुरु करण्यात आला.सन १९६२ साली पुण्यामधील राजा केळकर संग्रहालय सर लोकांसाठी उघडे करण्यात आले.
सन १९४४ साली सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने पूर्वोत्तर भारतात राष्ट्रीय ध्वज फडकाविला होता.
सन १९७२ साली भारत आणि बांगलादेश यांच्यात मित्रता करार झाला.
सन १९९८ साली भारतीय जनता पार्टीचे सदस्य अटल बिहारी वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आले होते.
सन २००१ साली अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी इराकविरुद्ध युद्ध पुकारले होते
सन २००५ साली पाकिस्तान देशाने “शाहीन-२” क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)