ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
विलेपार्लेतील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाची जिम्नॅस्ट अनुष्का पाटीलला शिष्यवृत्ती.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

विलेपार्लेतील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाची जिम्नॅस्ट अनुष्का पाटीलला शिष्यवृत्ती.

प्रकाशन: 15 Mar 2022 11:49 AM
वाचन संख्या 42

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल (ISO प्रमाणित) तर्फे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू व सर्व विश्वस्तांच्यावतीने स्व. डॉ. पुष्पा रमेश प्रभू यांच्या स्मरणार्थ शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) देण्यात येणार आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संकुलाचे विश्वस्त व सचिव डॉ. मोहन राणे यांच्या शुभ हस्ते ज्युनिअर आर्टिस्टिक जिम्नॅस्ट अनुष्का पाटीलला २५ हजार रुपये रोख व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या वर्षांपासून दरवर्षी क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संकुलातील एका पात्र खेळाडूला शिष्यवृत्ती(स्कॉलरशिप) देण्यात येणार आहे. यावर्षी २०२२-२३ च्या पहिल्या शिष्यवृत्तीची मानकरी संकुलाची ज्युनिअर आर्टिस्टिक जिम्नॅस्ट अनुष्का पाटील ठरली आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरविंद प्रभू, सचिव डॉ. मोहन राणे, विश्वस्त मकरंद येडुरकर, लीना प्रभू आदी मान्यवर उपस्थित होते.


अनुष्का अजित पाटील एक राष्ट्रस्तरीय जिम्नॅस्ट आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये तिने चमकदार कामगिरी करत जम्मू येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले व उत्तम कामगिरी करत बॅलंसिंग बीम प्रकारात १ सुवर्ण व सांघिक रौप्य पदक मिळवून एप्रिल २०२२ मध्ये हरियाणा येथे होणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स मधील आपला प्रवेश निश्चित केला आहे.
२०१९ साली तिने उत्तम कामगिरी करत सब स्पर्धेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावत राजस्थान येथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले व उत्तम कामगिरी करत वैयक्तिक २ सुवर्ण व १ रौप्य पदक पटकावत राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळवून दिला.


तिने आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स करण्यास ४ वर्षांची असताना प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विलेपार्ले येथे सुरुवात केली व आजही ती ह्याच संकुलात प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दररोज साधारण ७ हे ८ तास आपला सराव करत आहे. अनुष्का ७ वर्षांची असताना तिने मुंबई स्कूल्स स्पोर्ट्स असोसिएशनने आयोजित केलेल्या आंतरशालेय स्पर्धेमध्ये २ सुवर्ण पदके पटकावली. तसेच त्याच दिवशी तिने विबग्योर इंटरनॅशनल स्कूल्सने आयोजित केलेल्या आंतर शालेय स्पर्धेमध्येही २ सुवर्ण पदके पटकावली. तिने अनेक आंतरशालेय, जिल्हा स्तरीय, राज्य स्तरीय तसेच राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करत आजपर्यंत एकंदर ५ ट्रॉफीज व २७ सुवर्ण, २० रौप्य व १३ कांस्य अशी एकंदर ६० पदके मिळवली आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स