इन्सुली जंगलमय परिसरात भलामोठा गवा मृतावस्थेत आढळला
बांदा | राकेश परब : इन्सुली-बिलेवाडी येथील वस्तीपासून काहीशा अंतरावर जंगलमय परिसरात भलामोठा गवा मृतावस्थेत आढळून आला आहे. ही घटना आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास स्थानिकांच्या निदर्शनास आली. याबाबतची माहिती त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. दरम्यान वन अधिकारी मदन बाविस्कर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले त्याच्या मागच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला चालता येत नव्हते, त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की , बिलेवाडी येथील भर वस्तीपासून काहीशा अंतरावर जंगलमय परिसरात हा मृत गवा आढळून आला. ही घटना तेथील ग्रामस्थांच्या निदर्शनास आली . दरम्यान त्यांनी याबाबतची कल्पना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. तर बाविस्कर यांच्या म्हणण्यानुसार त्याच्या मागच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला चालता येत नव्हते . त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे.
वस्तीपासून जवळच गव्यांच्या वावरामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात गव्यांकडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कळपाने वावरणारे गवे शेतीची नासधूस करत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)