ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
लावण्य सिंधू चित्रपट संस्थेचा महिला दिन उत्साहात साजरा.

लावण्य सिंधू चित्रपट संस्थेचा महिला दिन उत्साहात साजरा.

प्रकाशन: 13 Mar 2022 12:03 PM
वाचन संख्या 121

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : आजच्या युगातील बदलत्या काळाची पावले ओळखून आत्ताच्या तरुण मुलींनी व महिलांनी राजकारणासह सहकार क्षेत्रात मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे असे प्रतिपादन जागतिक महिला दिनानिमित्त निबंधक सौउर्मिला यादव यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लावण्यसिंधु लोककला व चित्रपट सहकारी संस्थेतर्फे कणकवली येथे महिला दिन कार्यक्रम येथील श्री भवानी सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमात केले.

संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर उपरकर यांनी संस्थेने आतापर्यंत राबविलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. तसेच सध्या संस्थेतर्फे विविध विषयांवर डॉक्युमेंट्री फिल्म निर्मिती करण्यावर भर दिला जात असून जिल्ह्यातील सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था व कलाकारांनी एकत्र काम केल्यास त्याचा लाभ सर्वानाच होणार असल्याचे सांगितले. संस्थेच्या संचालिका तथा अभिनेत्री सौ. अक्षता कांबळी यांनी चित्रपटमालिका करताना कलाकार म्हणून आपल्याला आलेले अनुभव कथन केले.

यावेळी जिल्ह्यातील सांस्कृतिक व कला क्षेत्रात योगदान देणाऱ्या सावंतवाडी च्या सौ. गौरी नितीन बांदेकर, कुडाळच्या कु. भावना गुरुदास प्रभू, देवगड येथील सौ.आदन्या अभिषेक कोयंडे,कलमठ येथील कु. आर्या किशोर कदम,व करंजे येथील सौ. रश्मी मधुसूदन सोगम यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रे देऊन गौरव करण्यात आला. कु. आर्या कदम हिने मी सावित्रीबाई फुले बोलतेय म्हणत जोरदार व्याख्यान दिले. सर्व सत्कारमूर्तिनी इथे आपण एक स्त्री म्हणून अभिनय, नाट्य,एकांकिका,वक्तृत्व, चित्रपट, लघुपट करताना घरच्या पुरुषांची चांगली साथ मिळाल्यामुळेच आतापर्यंतची झेप घेऊ शकल्याबद्दल भावना व्यक्त केल्या.

याप्रसंगी संस्थेचे सचिव श्री. नितीन तळेकर,संचालक श्री. संतोष सावंत,कॅमेरामन श्री. रविकिरण शिवलकर,फोटोग्राफर श्री. धनंजय हळर्णकर तसेच श्री.नंदकुमार आरोलकर, किशोर कदम,सौ. वैभवी चौकेकर, सौ.धनश्री हळर्णकर,श्रद्धा सारंग,रश्मी उपरकर, रत्नप्रभा कोंडसकर, सौ.राठोड मॅडम,श्रीमती.दाभोलकर,
दीपा सरूडकर , स्मिता बुटाले , शुभांगी उबाळे , दिव्या साळगावकर , लक्षुमी गवस ,जान्हवी परब ,दीपा परब ,गंधाली तिरफणकर ,स्नेहा कदम ,आर्या कदम ,अमिता राणे ,अक्षता गोसावी,वैशाली राणे,अमिता गावडे ,श्रेया नाईक ,पूजा राणे ,मिलन पाटील,अनिशा राऊळ, साक्षी आमडोस्कर ,सरिता पाटील, अर्चना राणे,सलोनी मेस्त्री,सुप्रिया पाटील,अर्चना सावंत ,मनीषा मिठबावकर अश्या अनेक महिला महिला उपस्थित होत्या ,संस्थेच्या संचालिका अभिनेत्री सौ अक्षता कांबळी व संचालिका सौ प्रांजलं पराडकर यांनी उपस्थित महिलांना हळदीकुंकू देऊन सर्वांचे आभार मानून कार्यक्रम ची सांगता केली .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स