बेळगांव निवासी परमपूज्य श्री कलावतीदेवी यांचे कृपाशिर्वादाने बांदा गावात वार्षिक हरिनाम सप्ताहाचे आयोजन.
बांदा | राकेश परब : बेळगांव निवासी परमपूज्य श्री कलावतीदेवी यांचे कृपाशिर्वादाने बांदा गावात वार्षिक हरिनाम सप्ताह श्री हरिमंदिर , बेळगांव यांचे मार्गदर्शनाखाली शनिवार दि . १२ व रविवार दि . १३ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
शनिवारी १२ रोजी सायं . ४.०० ते ५.३० या वेळेत वारांचे सायंस्मरण भजन व अनुभव कथन व रात्रौ ७ ते ८.३० या वेळेत ” श्रीहरी प्रेमलहरी ” या पुस्तकातील चातुर्मासानंतरची एकादशी रात्रौस्मरण व अनुभव कथन होईल.
रविवार १३ रोजी सकाळी ८.३० ते ९ .३० या वेळेत बालोपासना व सायंकाळी ४.०० ते ५.३० या वेळेत वारांचे भजन व अनुभव कथन , रात्रौ ७ ते ८३० या वेळेत ” श्रीहरी प्रेमलहरी या पुस्तकातील चातुर्मासानंतरची एकादशी – रात्रौस्मरण व अनुभव कथन होऊन या उत्सवाची सांगता होईल.
येथील श्री विठ्ठल रखुमाई हॉल येथे कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमांचा गावातील व पंचक्रोशीतील सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन सिद्धकला भजनी मंडळ व बाल संस्कार केंद्र यांच्यावतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)