ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
तुमची कुटुंब संस्थांना आणि समाजाला गरज आहे. (संपादकीय).

तुमची कुटुंब संस्थांना आणि समाजाला गरज आहे. (संपादकीय).

प्रकाशन: 11 Mar 2022 08:02 AM
वाचन संख्या 185

मालवण | सुयोग पंडित (संपादकीय) : कालानुरुप महिलांसोबतच महिला दिनही सक्षम होत चाललेले आहेत.

अगदी पैठणीच्या खेळांपासून ते महिलांच्या क्रिकेट स्पर्धा,रक्तदान शिबिरे वगैरे अशी महिला दिनाच्या उपक्रमांची व्याप्ती वाढत आहे.

राजकारण,समाजकारण आणि अर्थकारण अशा तिनही स्तरावरील बॅनर्सवरुन आता स्वतः महिलाही एकमेकिंना शुभेच्छा देत आहेत. महिला दिन केवळ एक दिवस महिलेचा असा न राखता त्यातील महिला या तत्वाला सत्वाने ओळखायची शिकवण युवा किंवा अगदी शालेय पिढीलाही कृतीने होऊ लागलेली आहे आणि आजची शालेय किंवा युवा महिला ही देखील स्वतःला कुठे मुद्दामहून मागे किंवा पुढे न ठेवता स्वतःच्या नैसर्गिक क्षमता आणि आरोग्याची सक्षमता
या दोन्हींना सहज जाणून वावरु लागलेल्या आहेत.
आज महिला सक्षमीकरण उपक्रम हे खुद्द महिलांसाठी नसून ते तिच्याकडे दयेने,सहानुभूतीने वगैरे पहायच्या वृत्तींसाठी जास्त महत्वाचे ठरते.

“आम्ही महिलांचा सन्मान करतो”, हे भर सभेत कोणी ऐकवायची गरज नसून महिलांना जीवन अभ्यास,जाण, विचार,कृती यांना ऐकण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांकडूनही त्यांना खास निमंत्रीत केले जाते.

जीवनाची साठी पार करुन अनेक अनुभवांना शोषून जीवन जगत आहेत अशांनाही एखाद्या मध्यमवयीन स्त्रीचे किंवा समाजातील मध्यमवयीन माणसांचे विचार ऐकावेसे वाटतात अशी ज्येष्ठ नागरिकांची पिढीही जन्म घेत आहे हे खरेच एका सर्वसक्षम युगाचेच द्योतक.

यंदा महिला दिनी मालवणच्या ज्येष्ठ नागरीक संघाने शिक्षिका ज्योती तोरसकर बुवा यांच्या दैदिप्यमान शैक्षणीक यशाबद्दल त्यांचा सत्कार केला.
त्या सत्काराला उत्तर देताना ज्योती तोरसकर यांनी ज्येष्ठांना त्यांच्या प्रसन्नतेचे महत्व पटवून दिले.

स्वतःच्या जीवन भागिदाराशी संवेदनशीलतेने पटवून घेणे,टीका करणे सोडणे,एकमेकांच्या छोट्या छोट्या कृतींची प्रशंसा करणे आणि ज्यावेळी शारिरीक मर्यादेमुळे मुख्य प्रवाहात सामील होणे जमणार नाही अशावेळी काठावर बसून तो प्रवाह अनुभवणे अशा अनेक गोष्टींनी ज्येष्ठ नागरीकत्व कसे दर्जेदार राखले जाईल याविषयी शिक्षिका ज्योती तोरसकर बुवा यांनी मार्गदर्शन केले. समाजाला आणि कुटुंब संस्थांना ज्येष्ठांची गरज आहे हे शब्दांतून कोणी नीट पटवून देऊ शकत नसेल तरिही ती गरज आहेच हे जाणणेसुद्धा ज्येष्ठांचे अलिखीत सामाजिक कर्तव्यच असल्यासारखे आहे हे ज्येष्ठांनी जाणून घ्यावे हा ज्योती तोरसकर बुवा यांचा समाज सक्षमीकरणसाठीचा हेतू ज्येष्ठांनाही उद्बोधक व हुरुप देणाराच.

हा कार्यक्रम मालवणच्या ‘लीलांजली सभागृहात’ संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे बॅनर्स कुठे झळकलेले दिसले नाहीत. समारंभालाही रोषणाई,सजावट वगैरे फारशी नव्हती…तरिही हा सोहळा साजरा झाला यापेक्षा “संपन्न” झाला असे म्हणणे हे उचित् ठरेल.

मालवणच्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये डाॅक्टर्स, माजी शिक्षक,माजी बॅन्क कर्मचारी, लेखक,व्यावसायिक आणि समाजाच्या विविध क्षेत्रातील अनुभवी माणसे आहेत.

स्वतःच्या अनुभवांच्या भरगच्च शिदोरीतही त्यांना नवीन युगाचे बदल,अपेक्षा आणि विचार शांतपणे ऐकावेसे वाटतात हे ही माणुस सक्षमीकरणाचेच उदाहरण…आणि ते अभ्यासू विचार एका युवा स्त्रीचे आहेत हाही आजच्या महिलेच्या निरंतर सक्षमतेचाच पैलू ठरतो.

ज्येष्ठ नागरीकांनी एका अभ्यासू माणसाचे विचार मोकळेपणाने ऐकून सोहळा संपन्न करायची शिकवण दिली. बॅनर लावून केलेले चकचकीत सोहळेही समाजोपयोगी नसतात असे नक्कीच नाही.(बॅनर्स कुठे,कधी,कोणी व किती काळ लावावेत हा एक वेगळा अभ्यास असतो..!)

या दोन्हींची सांगड घालून होणारे सोहळे हीसुद्धा आजची सामाजिक चैतन्याची गरज आहेच….संपन्न होण्याची गरज आहेच.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स