ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
परब मराठा समाजातील महिलांनी उत्कर्ष साधावा : उपाध्यक्ष दीपक परब
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

परब मराठा समाजातील महिलांनी उत्कर्ष साधावा : उपाध्यक्ष दीपक परब

प्रकाशन: 09 Mar 2022 11:28 PM
वाचन संख्या 79

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : परब मराठा समाज मुंबई यांच्या वतीने जागतिक महिला दिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन दादर-मुंबई येथे करण्यात आले होते.

सध्या जवळपास सर्वच क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. पुरुषांच्या बरोबरीने त्या समाजात वावरत आहेत. परब मराठा समाजातील महिलांनी सुद्धा उत्कर्ष साधावा व यासाठी समाजातील महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी सर्व पदाधिकारी पुढे असतील असे प्रतिपादन परब मराठा समाजाचे उपाध्यक्ष तथा उद्योजक डॉ दीपक परब यांनी मुंबई येथे केले.

आंतरराष्ट्रीय मल्लखांब पटू अर्जुन पुरस्कार विजेती कु. हिमानी उत्तम परब हिचा संस्थेचे उपाध्यक्ष तथा उद्योजक श्री दिपक परब यांच्या हस्ते तर नॅशनल रोलर स्केटिंग चॅम्पियन २०२१ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या सौ. रिना बाबा परब हिचा सौ. भारती हेगडे परब यांच्या हस्ते कार्यक्रमाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला.

यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी संस्था उपाध्यक्ष उद्योजक दीपक परब, सरचिटणीस जी. एस परब, चिटणीस श्री प्रमोद बाळकृष्ण परब, महिला संघटक सौ प्रतिक्षा प्रमोद परब,सौ. भारती हेगडे परब, महिला संघटक सौ. प्रतिक्षा प्रमोद परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Article image

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स