ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवण तहसीलदार अजय पाटणे यांनी दिला विद्यार्थ्यांना दिलासा..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवण तहसीलदार अजय पाटणे यांनी दिला विद्यार्थ्यांना दिलासा..!

प्रकाशन: 09 Mar 2022 02:47 PM
वाचन संख्या 157

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सामान्यतः विद्यार्थ्यांना शासकीय दाखले मिळविताना अनेक अडचणी येत असतात. भविष्यात विद्यार्थी आणि पालक यांना असे विविध शासकीय दाखले महसूल विभागाच्या वतीने देण्यासाठी महसूल विभाग या पुढे सर्वतोपरी सहकार्य करणार आहे.


महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराजस्व अभियान अंतर्गत’ गावागावात हे दाखले उपलब्ध करून देणार आहोत. याचा लाभ विद्यार्थी पालक यांनी घेऊन आपल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक उन्नती साधावी. यासाठी महसूल विभागातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मसुरे येथे बोलताना मालवण तहसीलदार श्री अजय पाटणे यांनी सांगितले.

मसुरे आर पी बागवे हायस्कूल येथे महाराजस्व अभियान या शासनाच्या अभियानाअंतर्गत येथील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक दाखले देण्याचा शुभारंभ मालवण तहसीलदार अजय पाटणे यांच्या हस्ते करण्यात आला. हे दाखले उपलब्ध करून देण्यासाठी तहसीलदार अजय पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली मसुरे मंडळ अधिकारी श्रीयुत सुहास चव्हाण,तलाठी आर एस शेजवळ, महा ई सेतूचे श्रीयुत नवनाथ गोसावी, तलाठी आर एस शेजवळ आणि आरपी बागवे हायस्कूलचे प्राचार्य के ए चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले. मसुरे येथील पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे 30 विद्यार्थ्यांना या दाखल्यांचे वितरण अजय पाटणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर आरपी बागवे हायस्कूलचे मुख्याध्यापक के ए चव्हाण, मंडळ अधिकारी श्री सुहास चव्हाण, पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर, तलाठी शेजवळ, महसूलचे कर्मचारी श्रीकांत खोत, ई-सेवा केंद्राचे श्रीयुत नवनाथ गोसावी, एस बी चौगुले, आर एल पाताडे, एस व्हीं पिंगुळकर, एन एस जाधव, बी एस ठाकूर, के जी घाटे, समीर नाईक, आय एम नाटेकर, व्ही एस जाधव, भानुदास परब, डी पी पेडणेकर,चरणदास फुकट, अनिल मेस्त्री उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक के ए चव्हाण यांनी सूत्रसंचालन बी एस ठाकूर यांनी केले. इयत्ता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा निकालाची वाट न पाहता अगोदरच शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारे सर्व दाखले उपलब्ध करून ठेवल्यास भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही तसेच या सर्व विद्यार्थ्यांना मालवण तहसीलदार कार्यालयात कडून जे जे काही सहकार्य हवा असेल ते ते देण्याचे आश्वासनही या वेळी तहसीलदार अजय पाटणे यांनी मार्गदर्शन करताना दिले.

महाराष्ट्र शासना अंतर्गत महसूल विभागाच्या या उपक्रमाचे आणि यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे मालवण तहसीलदार अजय पाटणे यांचे उपस्थित विद्यार्थी, पालक,ग्रामस्थ आणि शिक्षक वर्गाने विशेष कौतुक केले.


यावेळी ई-सेवा केंद्राचे गोसावी, मंडळ अधिकारी श्रीयुत सुहास चव्हाण, मसुरे महसूल सर्व कर्मचारी,बागवे हायस्कूल कर्मचारी यांनी हे दाखले उपलब्ध करून देण्यासाठी विशेष परिश्रम घेतल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स