पडावे-माजगाव येथे काजू बागायतीला आग लागून सुमारे २ एकर क्षेत्रातील बागायती जळून खाक
बांदा |राकेश परब : पडावे-माजगाव येथे काजू बागायतीला आग लागून सुमारे २ एकर क्षेत्रातील बागायती जळून खाक झाली. कृषी सहायक अतुल माळी व डेगवे तलाठी सुधीर नलावडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नुकसानीचा २ लाख रुपयांचा पंचनामा केला. ऐन काजू हंगामात काजू बागायती जळाल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. काल दुपारी अचानक आग लागली. वारा व पालापाचोळा असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. स्थानिकांनी वेळीच धाव घेत आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला.
यामध्ये ऋषिकेश रामचंद्र गवस, सीताबाई आत्माराम गवस, ज्ञानेश विठ्ठल गवस या शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांचे नुकसान झाले. पंचनामा करण्यासाठी सरपंच लक्ष्मण गवस, ग्रामपंचायत कर्मचारी सतीश गवस, सचिन देसाई आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)