मसदे- चुनवरे गावात अनेक विकासकामांची शृंखला..!
माजी सभापती अनिल कांदळकर यांच्या हस्ते शुभारंभ
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसदे- चुनवरे गावातील विविध विकासकामांचा शुभारंभ माजी सभापती अनिल कांदळकर यांच्या हस्ते करण्यात आला. मसदे बौद्धवाडी नळपाणीपुरवठा योजना दुरुस्ती व विस्तारीकरण, जिल्हा परिषद निधीतून मंजूर झालेल्या मसदे विरणवाडी येथील अंगणवाडी दुरुस्त करणे , 15 व्या वित्त आयोगातून चुनवरे पालकरवाडी, बौद्धवाडी, मसदे बौद्धवाडी येथील सार्वजनिक शौचालय दुरुस्ती करणे आदी कामांचा शुभारंभ आज करण्यात आला.तसेच मसदे आरोग्य उपकेंद्र येथे सॅनिटरी पॅड डीस्पोजल मशीन चे उदघाटनही करण्यात आले.
यावेळी सरपंच श्रेया महेश परब, उपसरपंच कलाधर कुशे, ग्रा.पं. सदस्य शमिका वाडकर, अनिल जाधव, ग्रामसेवक भगवान जाधव, मनिष परब, राजन प्रभू, बाबू परब, पोलीस पाटिल महेश परब, शिवराम वाडकर आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)