ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आडारीत सुरु आहे नसबंदी केंद्राचे बांधकाम..!

आडारीत सुरु आहे नसबंदी केंद्राचे बांधकाम..!

प्रकाशन: 07 Mar 2022 06:26 PM
वाचन संख्या 86

नगरपरिषद राबवणार भटक्या कुत्र्यांचा निर्बिजिकरणाची मोहीम ..!

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरात भटक्या कुत्र्याचा प्रादुर्भाव वाढलेला होता. या बाबत नागरिकांच्या तक्रारी नप मध्ये येत होत्या . यावर उपाय योजना म्हणून http://localhost/news/public/uploads/2017 साली एका एजन्सी मार्फत मालवण नप आवारात कुत्रे निर्बिजिकरण मोहिम सुरू करण्यात आली होती.

पण नंतर या एजन्सी कडून काम करण्यास असमर्थता दाखवल्या मुळे हे काम थांबले होते. लाॅकडाऊन कालावधीनंतर भटक्या कुत्र्यांचा उपद्रव पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने वाढलेला होता.

त्यांनतर मागील 2 वर्षे या कामाच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. पण त्यांना प्रतिसाद मिळाला नव्हता. अखेर 8 डिसेंबर http://localhost/news/public/uploads/2021 ला चौथ्या वेळी केलेल्या निविदा प्रसिद्धीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
या कामाची सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन , कोल्हापूर
यांची निविदा मंजूर करण्यात आली आहे.
या कामाचे आदेश संबंधित निविदा धारकास देण्यात आले आहेत.

या नसबंदी केंद्राचे बांधकाम सध्या आडारी येथे सुरू आहे.लवकरच या ठिकाणी कुत्रे निर्बीजिकरणच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात पण होणार आहे अशी माहिती मालवण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे दिली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स