ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बिळवस येथील शुभस्तू पालव सनदी लेखापाल..!

बिळवस येथील शुभस्तू पालव सनदी लेखापाल..!

प्रकाशन: 07 Mar 2022 10:55 AM
वाचन संख्या 151

बिळवस हायस्कुल येथे झाला सत्कार

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : बिळवस येथील शुभस्तू कृष्णाजी पालव हा सनदी लेखापाल परीक्षा उत्तीर्ण झाल्या बद्दल त्याचा बिळवस ग्रामसेवा मंडळ मुंबई व माध्यमिक विद्यालय बिळवस तर्फे बिळवस हायस्कुल मध्ये मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत जगन्नाथ पालव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी भास्कर पालव, सुधीर सावंत, शाळा समिती उपाध्यक्ष गोविंद सावंत, मुख्याध्यापक श्री ठाकूर सर, मंडळाचे कार्यकारिणी सदस्य, शालेय समिती सदस्य, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व इतर निमंत्रित व्यक्तीं उपस्थित होत्या.


शुभस्तू यांने विद्यामंदिर गोवंडी मधून शालांत परीक्षेत ९५% गुण मिळविलेले आहेत व १२ वी बी.काॅम चे शिक्षण पोतदार काॅलेज माटुंगा येथे केले व एच.एस.सी परिक्षेत ९२% गुण प्राप्त केलेले आहेत. सदरहू विद्यार्थ्याने जे प्राविण्य संपादन केलेले आहे त्याचे पंचक्रोशीतील प्रत्येक विद्यार्थ्याने अवलोकन करावे हाच मंडळाचा हेतू आहे. पंचक्रोशीतील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचा मंडळाचा मानस आहे असे प्रतिपादन यावेळी अध्यक्ष सूर्यकांत पालव यांनी केले. मान्यवरांनी शुभस्तू याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स