ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
बांद्यात पतंजली महिला योग वर्गाचे उद् घाटन

बांद्यात पतंजली महिला योग वर्गाचे उद् घाटन

प्रकाशन: 07 Mar 2022 01:06 AM
वाचन संख्या 47

बांदा | राकेश परब: बांदा दशक्रोशीमध्ये पतंजली योग परिवारातर्फे योग प्रसाराचे कार्य वेगात सुुरु आहे. या कार्याचा एक भाग म्हणून नुकतेच बांदा पतंजली महिला योगवर्गाचे उदघाटन करण्यात आले.

श्री बांदेश्वर मंदिराच्या सभागृहात हा योग वर्ग आरंभ करण्यात आला आहे. या महिला योग वर्गाचे उद्घाटन श्री बांदेश्वर भुमिका देवस्थान समितीचे अध्यक्ष सुभाष मोर्ये यांच्याहस्ते झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्ही.एन.नाबर स्कूलच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई या होत्या.तर प्रमुख अतिथी म्हणून प्रशिक्षक तथा पतंजली गोवा राज्य युवा भारत प्रभारी गिरिश परुळेकर,पतंजली गोवा राज्य योग समिती प्रभारी विश्वास कोरगांवकर तसेच  जि.प.सदस्य श्वेता कोरगावकर,ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, योगशिक्षक लक्ष्मण पावसकर आदी  उपस्थित होते. पहिल्याच दिवसापासून या योगवर्गाला  महिलांची लक्षणीय उपस्थिती लाभली . पहिल्या दिवश सर्व साधकांनी प्राणायाम आणि सुक्ष्म व्यायाम केला. हा महिलांसाठी विशेष असलेला योगवर्ग दररोज सकाळी ५.३० ते ७.०० या वेळेत दररोज सुरु राहणार आहे. या योग वर्गाचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन बांदा पतंजली योग वर्गातर्फे करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स