ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बॅ. नाथ पै सेवांगण शाखा कट्टा चा ‘बापूभाई शिरोडकर अष्टावधानी गुरु पुरस्कार’ आचरे येथील सुरेश ठाकूर यांना प्रदान !

बॅ. नाथ पै सेवांगण शाखा कट्टा चा ‘बापूभाई शिरोडकर अष्टावधानी गुरु पुरस्कार’ आचरे येथील सुरेश ठाकूर यांना प्रदान !

प्रकाशन: 07 Mar 2022 01:12 AM
वाचन संख्या 52

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: बॅ. नाथ पै सेवांगण शाखा कट्टा यांच्यातर्फे दरवर्षी दिला जाणारा ‘बापूभाई शिरोडकर अष्टावधानी गुरु पुरस्कार’ मालवण तालुक्यातील आचरे येथील सुरेश शामराव ठाकूर यांना सेवांगण मालवणचे अध्यक्ष श्री. देवदत्त परुळेकर व उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी सेवांगण मालवणचे कार्याध्यक्ष श्री. दीपक भोगटे, कार्यवाह श्री. लक्ष्मिकांत खोबरेकर, सेवांगण कट्टाचे अध्यक्ष श्री. किशोर शिरोडकर, प्रसिद्ध कवी श्री. रुजारिओ पिंटो, श्री. नितीन वाळके, ॲड. देवदत्त परुळेकर, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, सौ. विणा ठाकूर, श्री. बापू तळावडेकर, मंगल परुळेकर, बाबाजी भिसळे, सुजाता पावसकर, वैष्णवी लाड, सेवांगण मालवणचे पदाधिकारी, को.म.सा.प. मालवणचे पदाधिकारी, कट्टा पंचक्रोशी व आचरे पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. “मोठी माणसे सद्विचार देत असतात. सद्विचार समाजात पेरत असतात. समाज बदलू शकतो तो केवळ अशा महान विचारवंतांमुळेच. ज्याला बदल घडवायचा आहे, त्याने प्रेम वाटायला शिकले पाहिजे. ठाकूर गुरुजींनी माणसं जमविली, त्यांच्यात सकारात्मकता रुजविली. त्यामुळेच विविध क्षेत्रात ते यशस्वी ठरले”असे प्रतिपादन सेवांगण मालवणचे अध्यक्ष श्री. देवदत्त परुळेकर यांनी काढले. “ठाकूर गुरुजींमध्ये एकापेक्षा अधिक व्यक्तिमत्त्वे दडली आहेत. बहुआयामी, बहुढंगी, बहुश्रुत, चतुरस्त्र अशी व्यक्ति या पुरस्काराच्या रुपाने आज आम्हाला लाभली. माणसे जोडण्याची विलक्षण कला ठाकूर गुरुजींना लाभली. महाराष्ट्रातील बालनाट्य चळवळीमधील त्यांच्या योगदानाची योग्य दखल घेतली पाहिजे”, असे उद्गार सेवांगण कट्टाचे अध्यक्ष श्री. किशोर शिरोडकर यांनी काढले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्ज्वलन करुन कोकणचे भाग्यविधाते, थोर संसदपटू बॅ. नाथ पै यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. आदर्श संगीत विद्यालय कट्टा यांनी साने गुरुजींची खरा तो एकची धर्म ही प्रार्थना सादर केली. सेवांगणचे कार्याध्यक्ष श्री. दीपक भोगटे यांनी आपल्या प्रास्ताविकातून बॅ. नाथ पै व बापूभाई शिरोडकर यांच्या कार्याच्या आढावा घेतला. दरवर्षी विविध सामाजिक क्षेत्रात आदर्शव्रत काम करणा-या व समाजासाठी आदर्श ठरणा-या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो, असे त्यांनी सांगितले. सेवांगण कट्टाच्या विविध उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. यावेळी ठाकूर गुरुजींच्या सौभाग्यवती सौ. विणा ठाकूर यांचाही शाल, श्रीफळ देवून सौ. वैष्णवी लाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रामचंद्र आंगणे यांनी आपल्याला भावलेले मार्गदर्शक ठाकूर गुरुजी याविषयी माहिती दिली. गुरुनाथ ताम्हणकर यांनी कथामाला व कोमसापच्या वतीने मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना श्री. ठाकूर गुरुजी म्हणाले, “बॅ. नाथ पै, प्रकाशभाई मोहाडीकर, भाऊ बागलकर, मधु दंडवते, देऊलकर सर, बापूभाई शिरोडकर यांच्या कार्याने प्रेरीत होवून वाटचाल करत असताना अनेक चांगले मित्र जोडता आले, चांगली विधायक कामे हातून घडली. बापूभाई शिरोडकर यांच्या नावाने पुरस्कार मिळाला हे माझे परमभाग्य आहे. अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, बालनाट्य चळवळ, विविध संस्कार शिबिरे आणि कोकण मराठी साहित्य परिषद यामध्ये जोडलेल्या माणसांचा हा खरा सन्मान आहे.” याच कार्यक्रमाचे औचित्य साधून बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा शाखेने महिलांसाठी घेतलेल्या वेषभूषा स्पर्धांमधील गुणवंत महिलांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व भेट्वस्तू देवून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. बाळकृष्ण नांदोसकर यांनी केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स