ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
डॉ.द.भि.खानोलकर चरित्र पुस्तकाला गुरुवर्य वराडकर यांचे आशीर्वाद

डॉ.द.भि.खानोलकर चरित्र पुस्तकाला गुरुवर्य वराडकर यांचे आशीर्वाद

प्रकाशन: 07 Mar 2022 12:56 AM
वाचन संख्या 61


१३ मार्च रोजी होणार बांद्यात प्रकाशन

बांदा / राकेश परब: एक झाड चंदनाचे या पुस्तकाची प्रत गुरुवर्य कृष्णाजी वराडकर यांना प्रदान करुन पुस्तक प्रकाशनाला त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले. जनसेवे व्रत स्वीकारुन आयुष्यभर समाजासाठी कार्य केलेले व मृत्युनंतरही देह जनसेवेला अर्पण करण्याची अंतिम इच्छा असलेले थोर समाजसेवक

स्व.डॉ.द.भि.खानोलकर यांच्या जीवनपटाचे दर्शन घडविणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन बांदा येथिल अभिनव दर्पण प्रतिष्ठानच्या वतीने रविवार दि.१३ मार्च रोजी करण्यात येणार आहे. अभिनव दर्पण चे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांनी हे पुस्तक लिहिले असून डॉ.द.भि.खानोलकर यांच्या कार्याला साजेसे “एक झाड चंदनाचे ” असे या पुस्तकाचे नाव आहे. शुक्रवारी अभिनव दर्पण तर्फे या पुस्तकाची प्रत गुरुवर्य कृष्णाजी वराडकर यांना अर्पण करुन प्रकाशन सोहऴ्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले.


डॉ.द.भि.खानोलकरांचे अत्यंत जवळचे सहकारी असलेले ९६ वर्षीय गुरुवर्य कृष्णाजी वराडकर यांना
वेंगुर्ला उभादांडा येथिल त्यांच्या निवासस्थानी जाऊन पुस्तक प्रदान करण्यात आले. यावेळी पुस्तकाचे लेखक प्रकाश तेंडोलकर, मुद्रक राजू तावडे, सरांचे सुपुत्र सुहास वराडकर,
अभिनव दर्पणचे उपाध्यक्ष मनोज मालवणकर ,सदस्य चंद्रकांत सावंत ,आशुतोष भांगले,निनाद सावंत आदी उपस्थित होते. वराडकर यांना पुस्तक पाहुन खुप आनंद झाला. त्यांनी सर्वांचे कौतुक केले व प्रकाशन सोहऴ्याला शुभेच्छा दिल्या.यावेळी त्यांनी डॉक्टरांच्या अनेक आठवणीही सांगितल्या.
बांदा दशक्रोशीत रुग्णसेवेचे अतुलनीय कार्य केलेले डॉ.द.भि.खानोलकर यांची माहिती ,छायाचित्रे वगैरे ठिकठिकाणी जाऊऩ अनेक वर्षे परिश्रमपुर्वक संकलित करुन प्रकाश तेंडोलकर यानी पुस्तकाचे लेखऩ केले आहे.


रविवार दि.१३ मार्च रोजी बांदा केंद्रशाळेच्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते या सोहऴ्याचे प्रकाशन होणार आहे.स्व.डॉ.द.भि.खानोलकर
हे वंदनीय नाव बांदा व परिसारातील जनतेच्या हृदयात मोठ्या सन्मानाने जतन केलेले आहे.त्यामुळे या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु आहे. या प्रकाशन सोहळ्याबाबत विस्तृत माहीती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स