ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
जागतिक महिला दिनानिमित्त गीतगायन व कविता लेखन स्पर्धा
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

जागतिक महिला दिनानिमित्त गीतगायन व कविता लेखन स्पर्धा

प्रकाशन: 06 Mar 2022 09:20 PM
वाचन संख्या 97

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, शाखा मालवण यांच्या वतीने मालवण तालुकास्तरीय महिला शिक्षकांसाठी गीतगायन स्पर्धा व सर्व शिक्षकांसाठी कविता लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दोन्ही गटातील गुणानुक्रमे तीन स्पर्धकांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल. तरी जास्तीत जास्त शिक्षकांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, ही विनंती. महिला शिक्षकांसाठी गीतगायन स्पर्धा मराठी भावगीत किंवा भक्तीगीत गायनाचा व्हिडिओ 9421646516 (तेजल ताम्हणकर) या क्रमांकावर दिनांक 7 मार्चपर्यंत पाठवावा. संगीत साथ किंवा कराओके म्युझिकचा वापर करता येईल.

सर्व शिक्षकांसाठी कविता लेखन स्पर्धा महिला दिन (महिलांची प्रगती, महिलांचा विकास, महिलांचे सामर्थ्य, महिलांच्या समस्या व त्यावर मात ई.) या विषयांवर आधारीत कविता लेखन करुन स्वरचित कविता वाचनाचा व्हिडिओ करावा व 9421263560 (पर्शुराम गुरव) या क्रमांकावर लेखी कविता व व्हिडिओ दिनांक 7 मार्च पर्यंत पाठवावा.

असे आवाहन अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, शाखा मालवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स