ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवण मधील मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवण मधील मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रकाशन: 06 Mar 2022 09:27 AM
वाचन संख्या 34

एमएसपीएम मेडीकल कॉलेज आणि गणेश कुशे , ममता वराडकर यांचे आयोजन

चिंदर / विवेक परब : एमएसपीएम मेडीकल कॉलेज पडवे – सिंधुदुर्ग आणि माजी नगरसेवक गणेश कुशे , माजी नगरसेविका ममता वराडकर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला . या शिबिराचा ९० जणांनी लाभ घेतला .

ग्रामीण रुग्णालय नजीक विद्याधर निवास येथे सकाळी ९ ते दुपारी १ यावेळेत हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये हृदयरोग तपासणी, नेत्र तपासणी, प्रसूतीशास्त्र आणि स्त्री रोग तपासणी, युरोलॉजी तपासणी, अस्थीरोग तपासणी, आहारतज्ञ सल्ला आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या . या शिबिरात ९० जणांनी तपासणी केली . यावेळी माजी नगरसेवक गणेश कुशे, माजी नगरसेविका ममता वराडकर, एमएसपीएम हॉस्पिटलचे अरविंद कुडतरकर यांच्यासह सर्व डॉक्टर्स, राजेश कुशे, निकीत वराडकर, विजय केनवडेकर , गार्गी कुशे, ललित चव्हाण आदी उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आबा हडकर , मोहन वराडकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी शिबिराला भेट दिली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स