ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वाफोली सोसायटीच्या अध्यक्षपदी धनश्री विलास गवस यांची, तर उपाध्यक्षपदी अनिल शांताराम गवस यांची निवड
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वाफोली सोसायटीच्या अध्यक्षपदी धनश्री विलास गवस यांची, तर उपाध्यक्षपदी अनिल शांताराम गवस यांची निवड

प्रकाशन: 06 Mar 2022 09:18 AM
वाचन संख्या 29

बांदा /राकेश परब : वाफोली येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक आज बिनविरोध पार पडली. सोसायटीच्या अध्यक्षपदी ग्रामविकास पॅनलच्या धनश्री विलास गवस तर उपाध्यक्षपदी अनिल शांताराम गवस यांची निवड करण्यात आली. संचालक मंडळात शिवाजी गवस, मारुती गवस, विष्णू गवस, हरिश्चंद्र आरोंदेकर, जयदेव गवस, चंद्रकांत आईर, दशरथ आईर, ज्ञानेश्वर ठाकूर, भाग्यश्री खानोलकर, अर्जुन गवस यांची निवड करण्यात आली.

निवडणूक अधिकारी म्हणून सावंतवाडी उपनिबंधक कार्यालयाचे श्रीकांत कावले यांनी काम पाहिले. यावेळी युवा नेते विनेश गवस, वाफोली देवस्थान कमिटीचे अध्यक्ष विलास गवस, पोलीस पाटील आना गवस, धर्मेंद्र खानोलकर, सचिन गवस, सतीश गवस, बापू राणे, संदीप धुरी, सेल्समन संगीता कोकरे, सचिव सुधा गवस, मापारी हरी गवस, रंजन गवस आदी उपस्थित होते. यावेळी नूतन पदाधिकारी व संचालक मंडळाचे विनेश गवस, विलास गवस यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

नूतन अध्यक्ष धनश्री गवस म्हणाल्या की, आपल्या सहकार क्षेत्रातील अनुभवाचा वापर करून संस्थेच्या सर्व संचालक मंडळ व गावातील सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठीतांना एकत्र घेऊन सोसायटीच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्यात येईल . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनेश गवस यांनी केले तर आभार विलास गवस यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स