ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
'राम रतन धन लता मंगेशकर' कार्यक्रमाचे ८ मार्च रोजी आयोजन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

'राम रतन धन लता मंगेशकर' कार्यक्रमाचे ८ मार्च रोजी आयोजन.

प्रकाशन: 03 Mar 2022 07:44 PM
वाचन संख्या 44

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती (रजि.) आणि संस्कृता फाउंडेशन ‘ विलेपार्ले यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ८ मार्च २०२२ जागतिक महिला दिनी ‘ भारताची सुपुत्री स्वरसम्राज्ञी गानकोकिळा भारतरत्न विभूषित स्व.श्रीमती लता मंगेशकर यांना ‘ राम रतन धन लता मंगेशकर’ या शीर्षकाद्वारे भारतरत्न लतादीदींना त्यांच्याच गाण्यांवर शास्त्रीय नृत्यातून आदरांजली वाहण्यात येणार आहे . प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल , शहाजी राजे मार्ग , विलेपार्ले ( पूर्व ),मुंबई ४०००५७ येथील प्रशस्त प्रागंणात महिला दिनी सायंकाळी ६ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .ख्यातनाम शास्त्रीय नृत्यपंडित व समकालीन सुप्रसिद्ध नृत्यांगना श्रीमती शुभदा वराडकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या विविध नृत्य माध्यमातील अनेक मान्यवर कलावंत लतादीदींच्या शाश्वत गीतांवर आपला नृत्याविष्कार सादर करून त्यांच्या प्रति आदरांजली व्यक्त करतील . मुंबईचे माजी महापौर व माजी आमदार स्व . श्री . रमेश यशवंत प्रभू यांनी २५ वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीची स्थापना केली . या समिती अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात विविध खेळाद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार व्हावेत , याकरिता निष्णात प्रशिक्षकांची नेमणूक केली आहे . क्रीडा प्रकारासह नृत्यकलेचेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण येथे दिले जाते . “राम रतन धन- लता मंगेशकर हा कार्यक्रम आयोजित केला असून तो सर्वांसाठी विनामूल्य आहे.सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे”, असे आवाहन श्री अरविंद प्रभू यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती (रजि.) यांच्यावतीने केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स