ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भूतनाथ देवस्थान आयोजित जिल्हास्तरीय संगीत भजन स्पर्धा संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भूतनाथ देवस्थान आयोजित जिल्हास्तरीय संगीत भजन स्पर्धा संपन्न.

प्रकाशन: 02 Mar 2022 05:59 PM
वाचन संख्या 105

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धार्मिक व सासंकृतीक सन्मानाच्या असणार्या जाणाऱ्या वायरी भूतनाथ येथील ‘श्री देव भूतनाथ देवस्थान’ आयोजित जिल्हा स्तरीय संगीत भजन स्पर्धेमध्ये ‘श्री समर्थ प्रासादिक भजन मंडळ’ कट्टा, बुवा संकेत मेस्त्री यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

प्राथमिक शिक्षक कला मंच ‘प्रासादिक भजन मंडळ, कुडाळ’, बुवा राजेश गुरव यांनी द्वितीय, आणि ‘ओम आदिनाथ सिध्द महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, कणकवली’, बुवा दिव्या गोसावी यांना तृतीय क्रमांक मिळाला.

वायरी भूतनाथ येथील श्री देव भूतनाथ देवस्थान तर्फे सोमवारी व मंगळवारी महाशिवरात्रीचे औचित्य साधून जिल्हास्तरीय संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या अंतिम दिवशी निकाल जाहीर करण्यात आला.
यानुसार प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे ५००० रुपये (संदीप बोडवे पुरस्कृत) व चषक, ४००० रुपये (साई माऊली व औदुंबर रिसॉर्ट पुरस्कृत) व चषक, ३००० रुपये (स्वरूप तळगावकर पुरस्कृत) व चषक अशी पारितोषिके देण्यात आली.

श्री मोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ नेरूर, बुवा भार्गव गावडे, श्री गिरोबा प्रासादिक भजन मंडळ बिबवणे, बुवा कुणाल शिरोडकर, श्री देवी प्रासादिक भजन मंडळ भोगवे बुवा मदन करलकर, यांना अनुक्रमे उत्तेजनार्थ प्रथम तीन साठी रोख रक्कम व आकर्षक चषक अशी पारितोषिके देण्यात आली.

स्पर्धेमध्ये वैयक्तीक विभागातून उत्कृष्ठ गायक : नरेंद्र मेस्त्री (दत्त प्रासादिक भजन मंडळ, वर्दे कुडाळ), उत्कृष्ठ पखवाज: दीपक मेस्त्री (शिक्षक कला मंच), उत्कृष्ठ तबला: राजाराम परुळेकर (श्री देवी प्रासादिक भजन मंडळ), उत्कृष्ठ हार्मोनियम : भार्गव गावडे (मोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ),
उत्कृष्ठ झांज : ललित कोळंबकर (देवी प्रासादिक भजन मंडळ), उत्कृष्ठ कोरस : समर्थ प्रासादिक भजन मंडळ कट्टा, उदयोन्मुख भजनी बुवा : यश कुडाळकर (स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ) व दिव्या गोसावी (आदिनाथ सिध्द महापुरुष प्रासादिक भजन मंडळ) यांनी पारितोषिके पटकावली.

स्पर्धेला पंच म्हणून हेमंत प्रभू मालवण, आणी सचिन पालव वेंगुर्ला यांनी काम पाहिले.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाला सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, जिल्हा परिषद सदस्य, हरी खोबरेकर, सिंधुरत्न भजन बुवा भालचंद्र केळुस्कर, मातृत्व आधार फाउंडेशन चे संतोष लुडबे, आप्पा चव्हाण, दादा वेंगुर्लेकर, कृष्णा देऊलकर आदी उपस्थित होते.

Article image

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद सातार्डेकर, नाना नाईक यांनी पाहिले. यावेळी देवस्थानचे मोहन बोडवे, भालचंद्र बोडवे, सुरेश बोडवे, रामचंद्र बोडवे, लक्ष्मण बोडवे, संदीप बोडवे, किरण बोडवे, गजानन बोडवे, मंदार बोडवे, संकेत बोडवे, चैतन्य बोडवे, प्रथमेश बोडवे, महेश तळवडेकर, भालचंद्र गावकर, प्रकाश पेंडूरकर आदी उपस्थित होते.

यावेळी मातृत्व आधार फाउंडेशन तर्फे सागरी पर्यावरण विषयक पत्रकारितेसाठी पत्रकार संदीप बोडवे यांचा तर कोविड योद्धा म्हणून गजनन बोडवे, मंदार बोडवे यांचा सन्मानपत्र व स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स