ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
मडुरा उपकेंद्रात शिवजयंती निमित्त डिगवाडी ग्रामस्थ मित्र मंडळातर्फे कोरोना योध्दा सन्मान
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मडुरा उपकेंद्रात शिवजयंती निमित्त डिगवाडी ग्रामस्थ मित्र मंडळातर्फे कोरोना योध्दा सन्मान

प्रकाशन: 27 Feb 2022 09:30 AM
वाचन संख्या 45

बांदा /राकेश परब : कोरोना कालावधीत मडुरा उपकेंद्र क्षेत्रात रुग्णांची संख्या वाढती होती . विलीगीकरणावेळी अनेक समस्यांना सामोरे जावे लागले . परंतु मडुरा पंचक्रोशीतील नागरिकांनी अपेक्षित सहकार्य करून कोरोनाचे प्रमाण घटविले असे प्रतिपादन , मडुरा तेजस्विनी माजगावकर यांनी केले.मडुरा उपकेंद्रात शिवजयंती निमित्त डिगवाडी ग्रामस्थ मित्र मंडळातर्फे आयोजित कोरोना योध्दा सन्मान कार्यक्रमात डॉ. माजगावकर बोलत होत्या . व्यासपीठावर सरपंच साक्षी तोरसकर, उपसरपंच विजय वालावलकर, सदस्या साक्षी परब, सानिका वेंगुर्लेकर , माधुरी वालावलकर, शशिकांत परब, मडुरा तंटामुक्त समिती अध्यक्ष बाळू गावडे , पोलीस पाटील नितीन नाईक, कोरोना समिती सदस्य यशवंत माधव, आरोग्यसेवक बापू कांबळी, डॉ. विकास बर्वे, आरोग्य सहाय्यिका श्रीमती रंगसूर, आशा स्वयंसेविका रेश्मा परब, आत्माराम खर्डे, सिद्धेश सावळ आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कोरोना योद्ध्याचा नारळाचे झाड देत डिगवाडी ग्रामस्थ मित्र मंडळातर्फे सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घनश्याम वालावलकर यांनी केले तर आभार विजय वालावलकर यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स