बांदा येथे दासनवमी सोहळा उत्साहात
बांदा /राकेश परब : बांदा येथील श्री विठ्ठल मंदिरामध्ये अनेक वर्षांच्या परंपरेप्रमाणे शुक्रवारी श्री रामदास नवमीचा सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी मंदिरात श्री विठ्ठल रखुमाईची नित्यपुजा तसेच श्री रामदास स्वामींच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. दुपारी देवतांना नैवेद्य अर्पण करुन भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.त्यानंतर महाप्रसादास आरंभ झाला . ठिक ७ वाजता मंदिरात नित्य सायं आरती झाली त्यानंतर स्थानिक भजनसेवेकऱ्यांची भजन सेवा झाली. त्यानंतर रात्री आरती होऊन सोहळ्याची सांगता झाली. भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)