नाबर इंग्लिश मिडियम स्कूलच्या पूर्ण प्राथमिक विभागात हरित दिन उत्साहात साजरा.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई संचलित व्ही. एन.नाबर इंग्लिश मिडीयम स्कूल प्रशालेच्या पूर्व प्राथमिक विभागात नुकताच हरित दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध हिरव्या पालेभाज्या,फळभाज्या यांचा वापर करून पदार्थ आणले ,हिरव्या भाज्यांचे प्रदर्शन भरवले, विद्यार्थ्यांनी
हिरव्या रंगाचे कपडे परिधान केले होते,पृथ्वी वाचवा,प्रदूषण रोखा या आशयाची पोस्टर्स विद्यार्थ्यांनी तयार केली . शिक्षकांनी विद्यार्थ्यांना निसर्गाचे महत्व,त्याची कशी काळजी घ्यावी याबद्दल माहिती दिली.निसर्गाचे रक्षण करून ,प्रदूषण रोखण्यासाठी काय करावे हे सांगितले. हरीत दिन साजरा करून विद्यार्थ्यांना निसर्गाचे महत्त्व पटवून दिले.
संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश कामत , प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई यांनी या हरित दिन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)