ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते झाले अत्याधुनिक बोटीचे  शानदार उदघाटन..!

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते झाले अत्याधुनिक बोटीचे शानदार उदघाटन..!

प्रकाशन: 21 Feb 2022 05:35 PM
वाचन संख्या 268

जिल्ह्याच्या पर्यटनाला मिळणार प्रवाही ऊर्जा.!

कणकवली | उमेश परब ( सिंधुदुर्ग ब्युरोचीफ ) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळावी यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून मालवण येथील इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड अँक्वाटीक स्पोर्टसला (इसादा) देण्यात आलेल्या अत्याधुनिक बोटीचे राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज उदघाटन झाले.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक उपस्थित होते.

राज्यातील साहसी पर्यटनाला चालना देणे, स्थानिकांसाठी पर्यटनाच्या संधी निर्माण करणे आणि साहसी पर्यटन अधिक रोमांचकारी बनविणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन मालवण येथील इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड अँक्वाटीक स्पोर्टसच्या (इसादा) माध्यमातून निवति रॉक जवळीक समुद्री तळाचे अंतरंग न्याहाळण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताफ्यात एक अत्याधुनिक बोट दाखल होत आहे. सिंधुदुर्गात आंतरराष्ट्रीय दर्जाचे जल पर्यटन विकसित करण्याच्या योजनेतील हा पहिला टप्पा समजला जात आहे.

विदेशात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीची डायव्हिंग बोट वापरली जाते. अशीच ही बोट असणार आहे. या बोटीवर स्कुबा डायव्हिंग करणाऱ्या पर्यटकांसाठी चेंजिंग रूम, प्रशस्त डेक आणीं केबिन, लाईफ सपोर्ट यंत्रणा, उत्तम सीटिंग व्यवस्था असणार आहे. रात्रीच्या स्कुबा डायव्हिंग साठीही या बोटीवर आधुनिक यंत्रणा असणार आहे. मालवण येथील एमटीडीसीच्या स्कुबा डायव्हिंग सेंटर मधून पर्यटकांना नीवती रॉक जवळील समुद्रात दर्जेदार स्कुबा डायव्हिंग घडवून आणण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले जात आहेत. परंतु नीवती रॉक जवळ पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी अत्याधुनिक बोटीची गरज भासत होती. इसदाच्या ताफ्यात आता अत्याधुनिक बोट दाखल होत असल्याने नीवती रॉक जवळील पर्यटनाला चार चांद लागणार आहेत.

आंध्रप्रदेश मधील पुंदुचेरी येथील शिपयार्ड मधून ही बोट घेऊन डॉ. सारंग कुलकर्णी निघाले. एकूण १८०० किलोमिटर चां हा प्रवास असणार आहे. पाच राज्यांमधील रामेश्वर, कन्याकुमारी, कोचीन, मंगळूर, कारवार असा प्रवास करून ही बोट मालवणमध्ये आणण्यात आली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स