ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
शिवजयंती निमित्त शिवप्रेमी मित्र मंडळ ,माणिक चौकच्या वतीने टेलिव्हिजन मालिका फेम सौरभ माळवदेचा सत्कार...!

शिवजयंती निमित्त शिवप्रेमी मित्र मंडळ ,माणिक चौकच्या वतीने टेलिव्हिजन मालिका फेम सौरभ माळवदेचा सत्कार...!

प्रकाशन: 20 Feb 2022 06:41 PM
वाचन संख्या 74

चिंदर |‍ विवेक परब : शिवजयंती निमित्त शिवप्रेमी मित्र मंडळ – माणिकचौकच्या वतीने रेकाॅर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वेंगुर्ले शहरातील उदयोन्मुख कलाकार टीव्ही स्टार सौरभ माळवदे यांचा सत्कार भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.
वेंगुर्ले शहरातील डुबळे गल्ली येथील रहिवासी असलेला सौरभ माळवदे यांनी अभिनयाने कोणतेही प्रशिक्षण घेतले नसताना सुद्धा आपल्या मेहनतीने व कष्टाने छोट्या छोट्या कार्यक्रमात सहभागी होऊन आजपर्यंत हा पल्ला गाठला.
घरची परिस्थिती बेताची असल्याने तसेच मुंबई मध्ये रहाणे व जेवणासाठी पैसे नसल्याने त्यावेळी वेंगुर्ले येथील खाजे, रेल्वे स्टेशनवर विकुन त्या पैशातून ऑडीशन दिली.
अभिनयाच्या जोरोवर सर्वप्रथम मालवणी सिरीयल ‘गाव गाता गजाली’ मध्ये काम करण्याची संधी मिळाली व नंतर एका पाठोपाठ एक बाळु मामा , स्वराज्य जननी जीजामाता , जिगरबाज , रंग माझा वेगळा , सावधान इंडिया FIR , जय जय स्वामी समर्थ इत्यादी नावाजलेल्या सिरीयल्समध्ये भूमिका करण्याचा मान मिळाला. या त्याच्या मेहनतीचा यथोचित सन्मान व्हावा म्हणून मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर लायनेस क्लबच्या नेहा यरनाळकर, प्राची मणचेकर, स्मिता कोयंडे, प्रतीक्षा मालवणकर, रुपाली पाटील, विवेक कुबल, माणिक चौक मित्रमंडळाचे नितीश कुडतरकर – रोहीत वेंगुर्लेकर -,प्रथमेश यंदे तसेच मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स